Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»“दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; पीडितांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही”… भाऊसाहेब भोईर
पिंपरी चिंचवड

“दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; पीडितांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही”… भाऊसाहेब भोईर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राज्याबाहेर असल्याने घटनास्थळी पोहोचता आले नाही; नागरिकांची मागितली दिलगिरी

पिंपरी चिंचवड…..मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी तीव्र संताप व्यक्त करत या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी केली आहे. पीडित कुटुंबांना न्याय आणि योग्य भरपाई मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात भोईर म्हणाले की, मोशी कचरा डेपोतील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेत बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकाप्रती त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जखमी नागरिकांनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करत पीडित कुटुंबांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे त्यांनी नमूद केले.

पूर्वनियोजित कामानिमित्त ७ जुलैपासून राज्याबाहेर असल्यामुळे ८ जुलै रोजी दुर्घटना घडल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचता आले नाही, याबद्दल त्यांनी नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. मात्र, प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही संपूर्ण परिस्थितीवर आपले सातत्याने लक्ष असून बचावकार्याबाबत संबंधित यंत्रणांशी संपर्क कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या एनडीआरएफ, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर बचाव यंत्रणांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने उपलब्ध सर्व मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा वापर करून बचावकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

अशा संवेदनशील प्रसंगी राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी बचाव यंत्रणांना सहकार्य करून पीडितांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले.

या दुर्घटनेची केवळ औपचारिक चौकशी करून चालणार नाही. कर्तव्यात कसूर करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधासह लागू असलेल्या कायदेशीर कलमान्वये कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

शहरात परतल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा वैयक्तिक पातळीवर सखोल आढावा घेणार असून, दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा शब्दही त्यांनी दिला.

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मोशी कचरा डेपोच्या संपूर्ण व्यवस्थापन, सुरक्षितता आणि आपत्ती प्रतिबंधक यंत्रणेची सर्वंकष पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleइंदिरानगर SRA प्रकल्पातील कथित घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करा; पात्र झोपडीधारकांचा SRA प्रशासनाला इशारा
Next Article “मोशी कचरा डेपो तात्काळ बंद करा; पुनावळे डेपो सुरू करा” – माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?