Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»इंदिरानगर SRA प्रकल्पातील कथित घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करा; पात्र झोपडीधारकांचा SRA प्रशासनाला इशारा
पिंपरी चिंचवड

इंदिरानगर SRA प्रकल्पातील कथित घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करा; पात्र झोपडीधारकांचा SRA प्रशासनाला इशारा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी | दि. १० जुलै २०२६ : इंदिरानगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत सुरू असलेल्या पुनर्वसन प्रकल्पात पात्र झोपडीधारकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत स्थानिक रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र व्यक्तींना योजनेचा लाभ देण्यात आल्याचा आरोप करत इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास संस्थेच्या वतीने संस्थेचे विधिज्ञ ॲड. अजित बोराडे यांनी SRA प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावली असून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संस्थेच्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरातील अनेक कुटुंबे गेली ३५ ते ४० वर्षे वास्तव्यास असूनही पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या पात्रता यादीत अनेक खऱ्या व पात्र झोपडीधारकांची नावे वगळण्यात आली आहेत. उलट काही अपात्र व्यक्तींचा यादीत समावेश करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पात्रता निश्चिती व सर्वेक्षण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून, नागरिकांनी वेळोवेळी सादर केलेल्या हरकती, तक्रारी आणि निवेदनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संस्थेने SRA प्रशासनाकडे पात्रता यादी व सर्वेक्षण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी, सर्व पात्र दाव्यांची फेरतपासणी, अपात्र व्यक्तींच्या समावेशाची चौकशी तसेच संबंधित सर्व नोंदी सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. याशिवाय प्रलंबित हरकती आणि आक्षेप निकाली निघेपर्यंत कोणत्याही झोपडीधारकावर बेदखल कारवाई, पाडकाम किंवा सक्तीचे स्थलांतर करण्यात येऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.

काही रहिवाशांनी पुनर्वसनाच्या घरांचे आश्वासन देत कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचाही आरोप केला आहे. तसेच प्रभावित कुटुंबांसाठी पुरेशी आणि सुरक्षित ट्रान्झिट व्यवस्था उपलब्ध नसल्याने अनेक कुटुंबांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“झोपडीधारकांनी वेळोवेळी निवेदने, तक्रारी आणि हरकती सादर करूनही त्यांना अद्याप सुनावणीची संधी देण्यात आलेली नाही. नागरिकांनी मांडलेल्या हरकती प्रलंबित असतानाच पुनर्वसनाची प्रक्रिया पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असल्याने नैसर्गिक न्याय तत्त्वांचे उल्लंघन होत आहे. पुनर्वसन हा झोपडीधारकांचा केवळ कायदेशीर अधिकार नसून मानवी हक्कदेखील आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत राबविणे आवश्यक आहे.”

— ॲड. अजित बोराडे, संस्थेचे वकील

“पात्र झोपडीधारकांच्या हक्कांवर गदा आणणारी कोणतीही कारवाई सहन केली जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा झोपडीधारकांना न्याय मिळविण्यासाठी न्यायालयीन तसेच लोकशाही मार्गाने तीव्र लढा उभारला जाईल.”

— दुर्योधन कदम, अध्यक्ष, इंदिरानगर झोपडपट्टी पुनर्वसन विकास संस्था

Post Views: 68
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरक्तदान, आरोग्यसेवा आणि संस्कारांचा संगम; श्रीमती शकुंतला चरडे यांचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
Next Article “दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; पीडितांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही”… भाऊसाहेब भोईर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?