Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी दुर्घटनेवर विरोधकांचा प्रशासनाला सवाल; बायो-मायनिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा…. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर
पिंपरी चिंचवड

मोशी दुर्घटनेवर विरोधकांचा प्रशासनाला सवाल; बायो-मायनिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा…. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील कचरा डेपो परिसरातील पीसीएमसीच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुसळधार पावसामुळे प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा व राडारोडा कोसळल्याने अनेक कर्मचारी आणि नागरिक अडकल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

विरोधी पक्षाने म्हटले आहे की, मोशी कचरा डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि धोकादायक कचऱ्याचे डोंगर सपाट करण्यासाठी महापालिकेने काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांची बायो-मायनिंग निविदा काढली होती. त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र, एवढा निधी खर्च करूनही कचऱ्याचा प्रचंड ढिगारा आजही कायम का आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

बायो-मायनिंगचे काम अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा दावा कागदोपत्री केला जात असताना प्रत्यक्षात कचऱ्याचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांची बिले अदा करूनही कामाची गती अत्यंत संथ का राहिली, यावर प्रशासनाने उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या कामावर महापालिकेचे प्रभावी नियंत्रण होते का, याचीही चौकशी करण्याची गरज असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

विरोधकांनी असा आरोप केला की, दोन महिन्यांपूर्वीही याच ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतरही संभाव्य धोका लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. पावसाळ्यापूर्वी धोकादायक ढिगारा अन्यत्र हलविणे ही संबंधित बायो-मायनिंग संस्थेची जबाबदारी होती. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पावसामुळे इमारतीच्या संरचनेवर परिणाम झाला, असे कारण पुढे करून प्रशासन जबाबदारी झटकू शकत नाही. कचऱ्याचे ढीग वेळेत हटविण्यात आले असते आणि कामगारांच्या सुरक्षिततेचे नियमित सुरक्षा लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) करण्यात आले असते, तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा दावा विरोधी पक्षाने केला आहे.

विरोधी पक्षाच्या प्रमुख मागण्या..

🔴ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांची तातडीने सुखरूप सुटका करून त्यांना सर्वोत्तम व मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत.

🔴संपूर्ण घटनेची वरिष्ठ स्तरावरील उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

🔴बायो-मायनिंग कंत्राटदारासह संबंधित जबाबदार अधिकारी व दोषींवर सदोष मनुष्यवधासह लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.

🔴भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मोशी कचरा डेपो आणि तत्सम प्रकल्पांमध्ये तातडीने सुरक्षा उपाययोजना, संरचनात्मक तपासणी आणि जोखीम व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

दरम्यान, दुर्घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून बचावकार्य सुरू असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनेची नेमकी कारणे चौकशीनंतर स्पष्ट होणार असली, तरी या घटनेमुळे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षा नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी दुर्घटनास्थळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.गिरीष महाजन यांची भेट
Next Article महापालिकेच्या महसूलवाढीबरोबरच आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?