Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी दुर्घटनास्थळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.गिरीष महाजन यांची भेट
पिंपरी चिंचवड

मोशी दुर्घटनास्थळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.गिरीष महाजन यांची भेट

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

२३ पैकी १४ जण सुरक्षित; उर्वरितांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी…मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा मोठा ढीग कोसळून इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, आतापर्यंत १४ जण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित नागरिकांची सुखरूप सुटका करणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

दुर्घटनेनंतर मंत्री महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी महेश लांडगे, शंकर जगताप, रवी लांडगे, डॉ. विजय सूर्यवंशी, विनय कुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री महाजन यांनी सांगितले की, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत एकूण २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी वरच्या मजल्यावरील पाच जण स्वतःहून सुरक्षित बाहेर आले, तर बचाव पथकाने सहा जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. आणखी तीन नागरिकांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे.

६०० मि.मी.पेक्षा अधिक पावसामुळे दुर्घटना

गेल्या ३० ते ३५ तासांत परिसरात ६०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्याने कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे कचऱ्याचा मोठा लोट इमारतीच्या दिशेने वाहून आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.

रात्रभर सुरू राहणार बचाव मोहीम

घटनास्थळी सध्या इमारतीचा मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. जागा अत्यंत कमी असल्यामुळे बचावकार्य अत्यंत सावधगिरीने आणि संथगतीने करावे लागत आहे. आवश्यक असल्यास ही मोहीम रात्रभर आणि सकाळपर्यंतही सुरू ठेवण्यात येणार असून, कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

सुखरूप बाहेर आलेले नागरिक

बचाव पथकाने सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह यांना सुखरूप बाहेर काढले. तर अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला हे दुर्घटनेनंतर स्वतःहून सुरक्षित बाहेर पडले. उर्वरित नागरिकांच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू आहे.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभावपूर्ण वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; आळंदीकर ग्रामस्थांचा अश्रुपूर्ण निरोप
Next Article मोशी दुर्घटनेवर विरोधकांचा प्रशासनाला सवाल; बायो-मायनिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा…. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?