Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 1, 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रो कामांमुळे अडथळे दूर करण्याच्या सूचना

July 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»प्राधिकरण ‘प्रॉपर्टी फ्री होल्ड’ निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा! आमदार महेश लांडगे यांचा सभागृहात औचित्याचा मुद्दा
महाराष्ट्र

प्राधिकरण ‘प्रॉपर्टी फ्री होल्ड’ निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा! आमदार महेश लांडगे यांचा सभागृहात औचित्याचा मुद्दा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
प्राधिकरणातील ५ लाख नागरिकांना दिलासा देण्याची मागणी

मुंबई । प्रतिनिधी ….पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (PCNDTA) गृहप्रकल्पांतील मालमत्ता तसेच निवासी भूखंड फ्री होल्ड करण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून लाखो नागरिकांना कायमस्वरूपी मालकी हक्क द्यावा, अशी जोरदार मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महाराष्ट्र विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

आमदार लांडगे यांनी सभागृहात मांडलेल्या मुद्द्यात सांगितले की, तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकसित केलेल्या गृहप्रकल्पांतील सदनिका, दुकाने, दालने, कार्यालयीन जागा तसेच निवासी भूखंड नागरिकांना ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर वाटप करण्यात आले होते. त्यानंतर या मालमत्तांचे अधिकार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) यांच्याकडे हस्तांतरित झाले. मात्र, राज्य शासनाने फ्री होल्डचा निर्णय घेतल्यानंतरही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

PMRDA हद्दीतील तब्बल ११ हजार २१३ सदनिका आणि ४९५ दुकाने, दालने व कार्यालयीन जागा फ्री होल्ड निर्णयाच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात असलेले तत्कालीन PCNDTA चे ८ हजार ३७९ निवासी भूखंड अद्याप फ्री होल्ड धोरणाच्या कक्षेबाहेर आहेत. त्यामुळे सुमारे एक लाख मालमत्ता आणि पाच लाखांहून अधिक प्राधिकरणवासीयांचा हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रलंबित प्रश्नामुळे मालकी हक्काबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून खरेदी-विक्री, बँक कर्ज, वारसा हस्तांतरण तसेच पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी आमदार लांडगे यांनी राज्य शासनाकडे चार महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. PMRDA हद्दीतील गृहप्रकल्पांच्या फ्री होल्ड निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, आवश्यक शासन आदेश, कार्यपद्धती (SOP), प्रीमियम निश्चिती आणि अर्ज प्रक्रिया त्वरित जाहीर करावी, तत्कालीन PCNDTA ने भाडेपट्ट्यावर वाटप केलेले व सध्या PCMC ताब्यात असलेले ८ हजार ३७९ निवासी भूखंड फ्री होल्ड करण्याचा प्रस्ताव येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करावा आणि या दोन्ही निर्णयांमुळे लाखो नागरिकांना कायमस्वरूपी मालकी हक्कासह मालमत्तेशी संबंधित सर्व व्यवहार सुलभ करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.

“प्राधिकरणातील लाखो नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या घराचा आणि भूखंडाचा कायमस्वरूपी मालकी हक्क मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. फ्री होल्ड निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून PMRDA हद्दीतील गृहप्रकल्प आणि तत्कालीन PCNDTA च्या निवासी भूखंडांना न्याय मिळवून देण्यासाठी मी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर करून अंदाजे एक लाख मालमत्ता आणि पाच लाख प्राधिकरणवासीयांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला कायमस्वरूपी न्याय मिळवून देण्यासाठी माझा ठाम प्रयत्न राहील.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड भाजपात आता ‘शिस्त पर्व’;कामगिरी दाखवा, अन्यथा पद सोडा
Next Article नगरसेवकांना सभागृहात मुक्तपणे बोलण्याचे स्वातंत्र्य द्या; थेट प्रक्षेपणही सुरू करा – मारुती भापकर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे शहरातील वृक्षगणनेच्या कामासंदर्भात विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांचा प्रश्न

July 1, 2026

१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 1, 2026

तासगाव अग्निशमन दलाचे गोविंद सूर्यवंशी व माजी आरोग्य अधिकारी सय्यद यांची ह्यूमन राइट्स असोसिएशनच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट

July 1, 2026

‘कालजयी श्रीगुरुजी’ विशेषांकाचे उद्या प्रकाशन

June 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 20260

पिंपरी, दि. १ जुलै : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याने नागरिक, विविध खासगी कंपन्यांतील…

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 1, 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रो कामांमुळे अडथळे दूर करण्याच्या सूचना

July 1, 2026

महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व २०२६ निमित्त – आढावा बैठकीचे आयोजन

July 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?