पुणे, दि. १ जुलै : तासगाव (जि. सांगली) येथील अग्निशमन दलाचे अधिकारी श्री. गोविंद सूर्यवंशी तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी आरोग्य अधिकारी श्री. सय्यद यांनी ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान मानवी हक्क संरक्षण, सामाजिक जनजागृती, नागरिकांचे आरोग्य, आपत्कालीन सेवा तसेच विविध सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या कार्याची माहिती घेऊन भविष्यात जनहिताच्या उपक्रमांमध्ये परस्पर सहकार्य करण्याबाबत सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाली.
यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या हितासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
