Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जमिनीच्या व्यवहाराच्या वादातून दगडाने हल्ला; एक गंभीर जखमी, आरोपी अटकेत

June 30, 2026

मावळात किरकोळ वादातून मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

June 30, 2026

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलतर्फे विशेष सन्मान

June 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»सामाजिक कार्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पैलवान काळुराम लांडगे यांना ‘राष्ट्रीय शाहू पुरस्कार–२०२६’
महाराष्ट्र

सामाजिक कार्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पैलवान काळुराम लांडगे यांना ‘राष्ट्रीय शाहू पुरस्कार–२०२६’

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कोल्हापूर, दि.२८ जून २०२६ : समाजातील वाढती नकारात्मकता, द्वेष आणि वैचारिक अधोगती रोखण्यासाठी जागृत नागरिकांनी समाजप्रबोधनाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित राज्य व राष्ट्रीय पुरस्कार–२०२६ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन करत समाजहिताची कार्ये अधिक जोमाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आणि संतांची शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू राहावे, असे त्यांनी सांगितले.

या सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पैलवान काळुराम लांडगे यांना ‘राष्ट्रीय शाहू पुरस्कार–२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. आमदार सतेज (बंटी) पाटील आणि खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पदक, मानाचा फेटा, शाल आणि बॅच देऊन सन्मानित करण्यात आले.

याशिवाय सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा, पत्रकारिता, उद्योग, कृषी, आरोग्य, अध्यात्म, योग, सहकार, शासकीय व निमशासकीय सेवा तसेच वंचित व उपेक्षित घटकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील ७५ मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला सखाराम जाधव, प्रभाकर कांबळे, अनिल म्हमाने, संदीप गुरव, राजेंद्र निकम, सचिन खराडे, संघसेन जगतकर तसेच जागतिक योगासन स्पर्धेतील रौप्यपदक विजेते राहुल चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे ग्रंथ, पुष्पगुच्छ, फेटा आणि बॅच देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिता काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, संजय चव्हाण, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, दिनकर आडसूळ, सुभाष पाटील, संजय गुरव, सर्जेराव हळदकर, विजय आरेकर आणि स्वप्नील गोरंबे यांनी विशेष सहकार्य केले.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचे प्रामाणिकपणाचे दर्शन
Next Article पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलतर्फे विशेष सन्मान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

जमिनीच्या व्यवहाराच्या वादातून दगडाने हल्ला; एक गंभीर जखमी, आरोपी अटकेत

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 30, 20260

पुणे, प्रतिनिधी : बावधन परिसरात जमिनीच्या विक्री एजन्सीच्या वादातून एका व्यक्तीवर दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची…

मावळात किरकोळ वादातून मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा

June 30, 2026

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलतर्फे विशेष सन्मान

June 30, 2026

सामाजिक कार्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पैलवान काळुराम लांडगे यांना ‘राष्ट्रीय शाहू पुरस्कार–२०२६’

June 30, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?