पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ख्रिश्चन सेल, पुणे यांच्या वतीने पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शहरात शिस्तबद्ध पोलीस व्यवस्था निर्माण करणे, अमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करून ड्रग्स माफियांवर कठोर नियंत्रण आणणे तसेच गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
पुणे पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात ख्रिश्चन सेलचे पुणे शहराध्यक्ष ख्रिस्तोफर जे. राजमनी यांच्या हस्ते आयुक्त अमितेश कुमार यांना शाल व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ख्रिस्तोफर जे. राजमनी यांनी सांगितले की, आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम झाली असून, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास नगरसेविका हिमाली कांबळे, आरपीआय (आठवले) ख्रिश्चन सेलच्या महिला पुणे शहराध्यक्ष डॉर्थी आर. थॉमस, येशू डोरेस्वामी, स्टॅन्डली नाथन, कॉलिग वॉश, अरुण पवार, दिव्या संतालिय, जॉन मुनवर सिंग यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थितांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्याचे कौतुक करत, भविष्यातही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांचे प्रभावी नेतृत्व कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
