Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय परिसरातील धोकादायक वृक्ष व इतर संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून कारवाईची मागणी

July 1, 2026

पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम; रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव दादासाहेब पोतनीस पारितोषिकाचे मानकरी

July 1, 2026

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रो कामांमुळे अडथळे दूर करण्याच्या सूचना
पिंपरी चिंचवड

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रो कामांमुळे अडथळे दूर करण्याच्या सूचना

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. १ जुलै : जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी-२०२६ पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी श्रीक्षेत्र देहू येथील मंदिर परिसर तसेच संपूर्ण पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. ७ जुलै रोजी होणारा पालखी प्रस्थान सोहळा शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्न वातावरणात पार पडावा, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

देहू येथील मंदिर परिसराची पाहणी करताना पोलीस आयुक्तांनी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्थान कार्यालयाला भेट देऊन संस्थानचे अध्यक्ष जालिंदर विश्वनाथ मोरे महाराज, विश्वस्त गणेश उत्तम मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पालखी सोहळ्यादरम्यान गर्दी व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच दर्शनबारीतील गर्दी नियंत्रणासाठी योग्य बॅरिकेडिंग व दोरांचा वापर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पालखी रथाचीही पाहणी करण्यात आली. संस्थानच्या वतीने पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पोलीस आयुक्तांनी अनगडशहाबाबा दर्गा आणि चिंचोली गाव येथील श्री शनि मंदिर या पालखी मार्गावरील विसाव्याच्या ठिकाणांचीही पाहणी केली. निगडीतील भक्तीशक्ती चौक ते मोरवाडी चौक या मार्गावर सुरू असलेल्या पुणे मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांची दखल घेत मेट्रो अधिकाऱ्यांना बॅरिकेडिंग मागे घेणे, संरक्षक जाळ्या उभारणे, राडारोडा हटवून रस्ता समतल करणे आदी उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पालखी मार्ग रुंद करण्यासाठी रस्त्यालगतचा राडारोडा हटविणे, झाडांच्या अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटणे तसेच मार्गातील कमानी हटविण्याबाबत निर्देश देण्यात आले.

या पाहणीवेळी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, विविध विभागांचे पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त प्रदीप ठेंगल तसेच महामेट्रोचे रेसिडेंट इंजिनिअर यतेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व २०२६ निमित्त – आढावा बैठकीचे आयोजन
Next Article सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय परिसरातील धोकादायक वृक्ष व इतर संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून कारवाईची मागणी

July 1, 2026

महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व २०२६ निमित्त – आढावा बैठकीचे आयोजन

July 1, 2026

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असणारे मुत्सद्दी राजकारणी – महापौर रवि लांडगे

July 1, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक; आरोग्य, शिक्षण व विकासकामांसह विविध विषयांना मंजुरी

July 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय परिसरातील धोकादायक वृक्ष व इतर संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून कारवाईची मागणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 20260

पिंपरी : शहरात पावसाळा सुरू असून मुसळधार पावसामुळे दुर्घटनांची शक्यता वाढली आहे. नुकत्याच मुंबईतील चेंबूर…

पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम; रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव दादासाहेब पोतनीस पारितोषिकाचे मानकरी

July 1, 2026

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?