Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम; रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव दादासाहेब पोतनीस पारितोषिकाचे मानकरी

July 1, 2026

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक; आरोग्य, शिक्षण व विकासकामांसह विविध विषयांना मंजुरी
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक; आरोग्य, शिक्षण व विकासकामांसह विविध विषयांना मंजुरी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. १ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक बैठक बुधवारी मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, पर्यावरण, अग्निसुरक्षा आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीनंतर सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाकडून महानगरपालिकेला मंजूर झालेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीतून मराठी शाळांची दर्जोन्नती, आरोग्य साहित्य खरेदी, महिलांसाठी आरोग्यविषयक सुविधा तसेच पर्यावरण आणि पर्यटनविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याणकारी’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, स्थायी समितीचे सदस्य तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महापालिकेच्या रुग्णालयांसाठी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आवश्यक औषधे, उपभोग्य साहित्य आणि ऑर्थोपेडिक साहित्य खरेदीस मंजुरी देण्यात आली. विविध प्रकारच्या औषधांच्या खरेदीलाही हिरवा कंदील देण्यात आला.

मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण विभागांतर्गत एमएस-सीआयटी उपकेंद्रांना मान्यता देण्यात आली. या माध्यमातून महिला, अनुसूचित जाती-जमाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांना केवळ १० टक्के शुल्कात, तर ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना ५ टक्के शुल्कात संगणक प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.

झोपडपट्टी भागातील सेवाशुल्क बिले वाटप आणि जनजागृतीचे काम महिला बचत गटांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक २० मधील सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईच्या कामास मुदतवाढ देण्यात आली.

याशिवाय रावेत येथील एक्सप्रेस फिडरवर अखंड वीजपुरवठ्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसविणे, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जलनिःसारणाची कामे, सांगवी स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीची दुरुस्ती व देखभाल तसेच जलशुद्धीकरण केंद्र आणि पंप हाऊस येथे अत्याधुनिक अग्निशामक उपकरणे बसविण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.

सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले की, स्थायी समितीचे निर्णय नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. या निर्णयांची वेळेत अंमलबजावणी झाल्यास पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू; ३९८ बीएलओ करणार घराघरांत भेटी
Next Article माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असणारे मुत्सद्दी राजकारणी – महापौर रवि लांडगे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रो कामांमुळे अडथळे दूर करण्याच्या सूचना

July 1, 2026

महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व २०२६ निमित्त – आढावा बैठकीचे आयोजन

July 1, 2026

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असणारे मुत्सद्दी राजकारणी – महापौर रवि लांडगे

July 1, 2026

पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू; ३९८ बीएलओ करणार घराघरांत भेटी

July 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
रत्नागिरी

पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम; रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव दादासाहेब पोतनीस पारितोषिकाचे मानकरी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 20260

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू जोगींदर रत्नागिरी, दि.०२ जुलै : माध्यमिक विद्यालय वरवडे…

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 1, 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रो कामांमुळे अडथळे दूर करण्याच्या सूचना

July 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?