Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम; रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव दादासाहेब पोतनीस पारितोषिकाचे मानकरी

July 1, 2026

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू; ३९८ बीएलओ करणार घराघरांत भेटी
पिंपरी चिंचवड

पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू; ३९८ बीएलओ करणार घराघरांत भेटी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि.०१ जूलै २०२६ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेला ३० जूनपासून प्रारंभ झाला आहे. या मोहिमेंतर्गत मतदारसंघातील ३९८ बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घराघरांत जाऊन मतदारांची माहिती पडताळणार असून ‘एन्युमरेशन फॉर्म (EF)’ वाटप व संकलनाचे काम करणार आहेत.

या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईएफ फॉर्मची छपाई, बीएलओंना साहित्य वाटप आदी कामे २९ जूनपर्यंत पूर्ण करण्यात आली. तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेऊन मोहिमेची माहिती देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलए-२ नियुक्त करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मोहिमेचे वेळापत्रक….

🔴३० जून ते २९ जुलै २०२६: बीएलओमार्फत घराघरांत जाऊन ईएफ फॉर्मचे वाटप व संकलन.

🔴५ ऑगस्ट २०२६: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध.

🔴५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६: दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी.

🔴५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६: दावे-हरकतींवर सुनावणी.

🔴७ ऑक्टोबर २०२६: अंतिम मतदार यादी प्रसिद्ध.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात ३९८ मतदान केंद्रे असून एकूण ४,०१,९७५ मतदार नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये २,०८,६५३ पुरुष, १,९३,२८३ महिला आणि ३९ इतर मतदार आहेत. २९ जूनपर्यंत सुमारे २,०४,२९३ (५१ टक्के) मतदारांचे २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग/प्रोजेनीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया या मोहिमेत पूर्ण केली जाणार आहे.

मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २३ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), ३९८ बीएलओ, ४० नोडल अधिकारी, प्रगणक, ग्राम महसूल अधिकारी, सेक्टर अधिकारी आणि १० पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गटांचीही मदत घेतली जात आहे.

श्री. जयराज देशमुख (अपर तहसीलदार) आणि श्री. अभिजीत केंद्रेकर (निवडणूक नायब तहसीलदार) हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मोहिमेवर थेट नियंत्रण ठेवत आहेत.

मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती अर्चना यादव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या कुटुंबातील पात्र मतदारांची नोंदणी आणि माहिती अद्ययावत असल्याची खात्री करून घरात येणाऱ्या बीएलओंना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. नागरिकांनी ECINET ॲपद्वारे किंवा संबंधित बीएलओशी संपर्क साधूनही माहिती मिळवू शकतात.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनगरसेवकांना सभागृहात मुक्तपणे बोलण्याचे स्वातंत्र्य द्या; थेट प्रक्षेपणही सुरू करा – मारुती भापकर
Next Article पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक; आरोग्य, शिक्षण व विकासकामांसह विविध विषयांना मंजुरी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रो कामांमुळे अडथळे दूर करण्याच्या सूचना

July 1, 2026

महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व २०२६ निमित्त – आढावा बैठकीचे आयोजन

July 1, 2026

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असणारे मुत्सद्दी राजकारणी – महापौर रवि लांडगे

July 1, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक; आरोग्य, शिक्षण व विकासकामांसह विविध विषयांना मंजुरी

July 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
रत्नागिरी

पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम; रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव दादासाहेब पोतनीस पारितोषिकाचे मानकरी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 20260

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू जोगींदर रत्नागिरी, दि.०२ जुलै : माध्यमिक विद्यालय वरवडे…

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 1, 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रो कामांमुळे अडथळे दूर करण्याच्या सूचना

July 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?