Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय परिसरातील धोकादायक वृक्ष व इतर संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून कारवाईची मागणी

July 1, 2026

पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम; रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव दादासाहेब पोतनीस पारितोषिकाचे मानकरी

July 1, 2026

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. १ जुलै : सिक्युरिटी व्यवसाय बंद पाडण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. आरोपीकडून एकूण ११ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत शामराव बाबर (वय ४४, रा. नवी सांगवी) यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली. आरोपी मसना ऊर्फ महेश सखाराम शिरोळे (वय २८, रा. मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) याने फिर्यादी व त्यांच्या कंपनीचे सुपरवायझर संदीप कणसे यांना मोबाईलवरून वारंवार संपर्क साधून सिक्युरिटी व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर सुरुवातीला १० लाख, त्यानंतर ८ लाख, ७ लाख आणि अखेरीस ६ लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा जीवे मारून टाकण्याची धमकी दिली होती.

तक्रारीनंतर खंडणीविरोधी पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ३ लाख रुपयांची खंडणी देण्याचे नाटक करण्यात आले. यासाठी काही खऱ्या नोटांसह डमी नोटांचा वापर करून बनावट रकमेचे बंडल तयार करण्यात आले.

दि. ३० जून २०२६ रोजी सायंकाळी मॅक्झिन चौक, आळंदी-पुणे रोड, दिघी येथील स्वच्छतागृहाजवळ आरोपी महेश शिरोळे हा ३ लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी रंगेहाथ पकडला. या कारवाईत आरोपीकडून एकूण ११ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दिघी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ३११/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम ३०८(२) व ३०८(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रो कामांमुळे अडथळे दूर करण्याच्या सूचना
Next Article संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026

दारूबंदी पथकाची कारवाई; रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

June 30, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय परिसरातील धोकादायक वृक्ष व इतर संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून कारवाईची मागणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 20260

पिंपरी : शहरात पावसाळा सुरू असून मुसळधार पावसामुळे दुर्घटनांची शक्यता वाढली आहे. नुकत्याच मुंबईतील चेंबूर…

पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम; रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव दादासाहेब पोतनीस पारितोषिकाचे मानकरी

July 1, 2026

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?