Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय परिसरातील धोकादायक वृक्ष व इतर संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून कारवाईची मागणी

July 1, 2026

पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम; रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव दादासाहेब पोतनीस पारितोषिकाचे मानकरी

July 1, 2026

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड भाजपात आता ‘शिस्त पर्व’;कामगिरी दाखवा, अन्यथा पद सोडा
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजपात आता ‘शिस्त पर्व’;कामगिरी दाखवा, अन्यथा पद सोडा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड: भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटनेत आता पक्षशिस्तीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता थेट ‘ॲक्शन’ घेतली जाणार आहे.

शहरातील वाढत्या अंतर्गत मतभेद आणि सार्वजनिक वक्तव्यांची गंभीर दखल घेत, शहर कोअर कमिटीने “कामगिरी दिसेल तरच पदलाभ, अन्यथा कोणालाही सूट नाही,” असा सज्जड इशारा दिला आहे.

शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे आणि सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे उपस्थित होते.

बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, पक्षाची अधिकृत भूमिका हीच अंतिम मानली जाईल. यापुढे संघटनेच्या व्यासपीठावर चर्चा न करता सार्वजनिकरित्या मत मांडणे किंवा माध्यमांतून दबावतंत्र वापरणे हा शिस्तभंग मानला जाईल आणि अशा संबंधितांवर कठोर संघटनात्मक कारवाई केली जाईल. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाचा स्वतंत्र आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बूथ स्तरावरील काम, सदस्य नोंदणी, जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांच्या आधारे पदाधिकाऱ्यांचे मूल्यमापन होणार असून, केवळ पद धारण करणाऱ्यांना नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरी करणाऱ्यांनाच भविष्यात संघटनेत संधी दिली जाणार आहे. महापालिकेतील स्वीकृत सदस्य नियुक्तीचे अधिकारही आता स्थानिक पातळीवर कठोर निकषांच्या चौकटीत राहून वापरले जातील, असेही या बैठकीत नमूद करण्यात आले आहे.

“भारतीय जनता पक्ष ही शिस्त, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभी असलेली विचारसरणी आहे. पक्षात वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा संघटनेचे हित सर्वोच्च आहे. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. संघटनेने दिलेली जबाबदारी जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडतील, त्यांनाच भविष्यात संधी मिळेल. पक्षविरोधी भूमिका किंवा शिस्तभंग कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.”

— शत्रुघ्न (बापू) काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleज्येष्ठत्व हा अनुभवाचा दागिना; समाजाला दिशा देणारे ज्येष्ठ नागरिक – अण्णा जोगदंड
Next Article प्राधिकरण ‘प्रॉपर्टी फ्री होल्ड’ निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा! आमदार महेश लांडगे यांचा सभागृहात औचित्याचा मुद्दा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय परिसरातील धोकादायक वृक्ष व इतर संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून कारवाईची मागणी

July 1, 2026

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून पालखी मार्गाची पाहणी; मेट्रो कामांमुळे अडथळे दूर करण्याच्या सूचना

July 1, 2026

महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व २०२६ निमित्त – आढावा बैठकीचे आयोजन

July 1, 2026

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असणारे मुत्सद्दी राजकारणी – महापौर रवि लांडगे

July 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय परिसरातील धोकादायक वृक्ष व इतर संसाधनांचे तातडीने सर्वेक्षण करून कारवाईची मागणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 20260

पिंपरी : शहरात पावसाळा सुरू असून मुसळधार पावसामुळे दुर्घटनांची शक्यता वाढली आहे. नुकत्याच मुंबईतील चेंबूर…

पत्रकारिता पदविकेत राज्यात प्रथम; रत्नागिरीचे शिक्षक संजय जाधव दादासाहेब पोतनीस पारितोषिकाचे मानकरी

July 1, 2026

संशयास्पद ZIP व APK फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन

July 1, 2026

सिक्युरिटी व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपी जेरबंद; ११.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?