Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्येष्ठत्व हा अनुभवाचा दागिना; समाजाला दिशा देणारे ज्येष्ठ नागरिक – अण्णा जोगदंड

July 1, 2026

पत्रकार बापूसाहेब गोरे : पत्रकारितेतील अभ्यासू, संयमी आणि संघटनक्षम नेतृत्व

July 1, 2026

पुणे शहरातील वृक्षगणनेच्या कामासंदर्भात विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांचा प्रश्न

July 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»ज्येष्ठत्व हा अनुभवाचा दागिना; समाजाला दिशा देणारे ज्येष्ठ नागरिक – अण्णा जोगदंड
पिंपरी चिंचवड

ज्येष्ठत्व हा अनुभवाचा दागिना; समाजाला दिशा देणारे ज्येष्ठ नागरिक – अण्णा जोगदंड

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघात संगीत मैफिलीसह वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

पिंपरी : सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जून महिन्यात वाढदिवस असलेल्या १२४ पुरुष व महिला सभासदांचा सामूहिक वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आणि संगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर संघाच्या सभासदांनी सादर केलेल्या सुमधुर संगीत गायनाच्या बहारदार कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी बोलताना अण्णा जोगदंड म्हणाले, “ज्येष्ठत्व हा अनुभवाचा दागिना आहे. ज्येष्ठ नागरिक दोन पिढ्या घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. आपल्या मुलांसह नातवंडांवर संस्कार, नातेसंबंधांचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील रूढी-परंपरांचे मूल्य ते रुजवितात. त्यांच्या अनुभवाची शिदोरी ही कुटुंबासह संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरते.”

माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी ज्येष्ठांना वयाचे बंधन विसरून आनंदी व सक्रिय जीवन जगण्याचा सल्ला दिला. “स्वतःसाठी जगा, आवडत्या गोष्टी करा आणि मन सदैव प्रसन्न ठेवा,” असे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ यांनी महासंघासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे तीन कोटी रुपयांच्या निधीची मागणी केल्याची माहिती दिली. तसेच चिंचवड येथे महासंघाची पाच मजली इमारत लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे यांनी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती देत, संघाच्या माध्यमातून सुमारे ४०० ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासासाठी सवलतीची कार्डे उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.

कार्यक्रमादरम्यान वाढदिवस असलेल्या सभासदांचे सौ. राजश्री शेलार, सौ. सुरेखाताई सावंत आणि सौ. भारती कोळेकर यांनी औक्षण केले. त्यानंतर संघाच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला. वाढदिवस असलेल्या सभासदांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला.

संघाचे उपाध्यक्ष साहेबराव देसले यांनी प्रास्ताविक केले, तर सचिव सुरेश बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खजिनदार प्रकाश सावंत, तुकाराम कोरडे, किशोर गायकवाड, धोंडीराम पाटील, राजेंद्र मोरे, शिवकांत जैस्वाल, रोहिदास पिलाने आणि धनाजी शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ, सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे, मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपत्रकार बापूसाहेब गोरे : पत्रकारितेतील अभ्यासू, संयमी आणि संघटनक्षम नेतृत्व
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पत्रकार बापूसाहेब गोरे : पत्रकारितेतील अभ्यासू, संयमी आणि संघटनक्षम नेतृत्व

July 1, 2026

भाजप नगरसेवकांना पक्षशिस्तीचा इशारा; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत

June 30, 2026

पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी-अंमलदारांचा सन्मानपूर्वक निरोप

June 30, 2026

पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी ते निगडी’ रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे नामकरण

June 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

ज्येष्ठत्व हा अनुभवाचा दागिना; समाजाला दिशा देणारे ज्येष्ठ नागरिक – अण्णा जोगदंड

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 1, 20260

सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघात संगीत मैफिलीसह वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पिंपरी : सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक…

पत्रकार बापूसाहेब गोरे : पत्रकारितेतील अभ्यासू, संयमी आणि संघटनक्षम नेतृत्व

July 1, 2026

पुणे शहरातील वृक्षगणनेच्या कामासंदर्भात विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांचा प्रश्न

July 1, 2026

१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?