Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मनोरंजन»समाज जीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच असते साहित्य – योगेश सोमण
मनोरंजन

समाज जीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच असते साहित्य – योगेश सोमण

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

निगडी, दि.२९ जून २०२६ : समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि संस्कार भारती, पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने “साहित्यिक संवाद” हा साहित्यिक उपक्रम रविवारी स्व. दत्तोपंत म्हसकर सभागृह, निगडी-प्राधिकरण येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण होते. समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षा मानसी चिटणीस यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, समरसता गीत आणि सुभाष चव्हाण यांच्या शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

आर्चिस केळकर, सुनिता कुलकर्णी आणि उज्वला केळकर यांनी अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद आणि डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रातील प्रेरणादायी उताऱ्यांचे अभिवाचन केले.

यावेळी डॉ. गिरीश आफळे, रविकांत कळमकर, प्रा. तुकाराम पाटील, शोभा जोशी, राजन लाखे, राज अहेरराव, राजेंद्र घावटे, सुरेश कंक, संदीप तापकीर, रमेश वाकनीस, विजय शेंडगे, पंजाबराव मोंढे, ह.भ.प. अशोक महाराज गोरे, नंदकुमार मुरडे, सविता इंगळे, प्रदीप तळेकर, राजेंद्र देशपांडे, नीलिमा फाटक, राधाबाई वाघमारे, माधुरी विधाटे, कैलास भैरट, आनंदराव मुळुक, सुलभा सत्तुरवार, अश्विनी रानडे, वैशाली मोहिते, शरद काणेकर, रजनी अहेरराव, राजेश चौधरी, मीनाताई पोकरणा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि परिसरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साहित्यिक संवाद साधताना योगेश सोमण म्हणाले, “समाज जीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच साहित्य असते. खऱ्या अर्थाने समाजच माणसाला साहित्य शिकवतो. साहित्यिक समाज घडवत नाही, तर समाजच साहित्य घडवतो. लेखक हा स्वतःचा पहिला वाचक असतो. साहित्य हे जीवनानुभवातून यावे; त्यात कृत्रिम कल्पनाविलास नसावा. उपदेशापेक्षा कृतीतून परिणाम साधणारे लेखन अधिक प्रभावी ठरते.”

ते पुढे म्हणाले, “साहित्यिकांनी एका चौकटीत अडकून न राहता सातत्याने नवे शिकले पाहिजे. सकारात्मकता हीच शाश्वत आहे. तरुण पिढी वाचन करत नाही हा गैरसमज असून, ते काय वाचतात याचा अभ्यास साहित्यिकांनी केला पाहिजे. साहित्य समृद्ध होण्यासाठी समाजातील माणसे एकत्र येणे आवश्यक आहे.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड शहर कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वबोध आणि नागरी कर्तव्य या ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेवर विचार मांडत, “नव्या पिढीला अभिमान वाटेल असा देश आपण घडवूया,” असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रश्नोत्तर सत्रात नारायण देशपांडे, नितीन हिरवे आणि नीलिमा फाटक यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य वाढविणे, दूरदर्शनवरील नकारात्मक आशय, विद्रोही साहित्याची दिशा, लोहगड घटनेवरील साहित्यिकांची भूमिका आणि साहित्य परिषदेच्या शाखा विस्तारासंदर्भातील प्रश्न उपस्थित केले. या सर्व प्रश्नांना योगेश सोमण यांनी समर्पक उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसी चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा पाठक यांनी तर आभार प्रदर्शन सुहास घुमरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन राऊत, नारायण देशपांडे, हेमंत जोशी, जयश्री श्रीखंडे, निलेश शेंबेकर, सुप्रिया लिमये, सुरेश जोशी, श्रद्धा चटप आणि निलेश देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रज्ञा फुलपगार यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post Views: 17
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगुणवंत विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ नागरिक संघाकडून गौरव; विकासनगर-किवळे येथे सत्कार सोहळा उत्साहात
Next Article पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सर्वधर्मीय १६०० विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरव

July 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?