Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सर्वधर्मीय १६०० विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरव

July 3, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

July 3, 2026

शालेय साहित्याच्या निविदेविरोधात विकास साने आक्रमक; ‘डीबीटी’ धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

July 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मनोरंजन»सर्वधर्मीय १६०० विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरव
मनोरंजन

सर्वधर्मीय १६०० विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरव

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अहिल्यानगर (श्रीगोंदा) प्रतिनिधी….. सामाजिक बांधिलकी जपत सर्व जाती-धर्मांतील विवाह इच्छुकांचे संसार थाटण्याचे कार्य करणारे श्रीगोंद्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा ढवळे सर्व जाती-धर्मीय वधू-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष सुभाष ढवळे यांनी आतापर्यंत १६०० हून अधिक विवाह जुळवून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांच्या वतीने अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, नुकताच त्यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हळगाव येथील रहिवासी असलेले सुभाष ढवळे हे सामाजिक कार्याची आवड जोपासत श्रीगोंदा येथे स्थायिक झाले. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून विवाह इच्छुक युवक-युवतींचे विवाह जुळविण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. वाढत्या सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर विवाह जुळविणे कठीण होत असताना त्यांनी हजारो कुटुंबांना आनंदाचे क्षण दिले आहेत.

सुभाष ढवळे यांनी सर्वधर्मीय आणि सर्व समाजातील युवक-युवतींच्या विवाहासाठी निःस्वार्थपणे कार्य करत १६०० हून अधिक शुभविवाह घडवून आणले आहेत. दोन कुटुंबांना एकत्र आणून सामाजिक सलोखा आणि माणुसकीची भावना जपण्याचे कार्य त्यांच्या वधू-वर सूचक मंडळामार्फत सातत्याने सुरू आहे.

त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत प्रहार दिव्यांग संघटना, अहिल्यानगर आणि जय मल्हार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष माधव गडदे, जिल्हाध्यक्ष विजय तमनर, सचिन जगताप, राजेंद्र पोकळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुरस्कार मिळाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, अनिताताई कदम, संजय लाड, आबासाहेब ढवळे यांच्यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुभाष ढवळे यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, एका विवाह सोहळ्यानिमित्त विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सुभाष ढवळे यांची भेट घेऊन त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी ढवळे वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने सुभाष ढवळे यांच्या हस्ते राम शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा

July 3, 2026

चिखली-मोशी परिसरात एसटी बस स्थानक उभारणार!

July 3, 2026

पिंपरी-चिंचवडच्या जलसुरक्षेसाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करा; विधानसभेत जोरदार मागणी

July 2, 2026

पिंपरी चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत – चेतन पवार 

July 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मनोरंजन

सर्वधर्मीय १६०० विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरव

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 3, 20260

अहिल्यानगर (श्रीगोंदा) प्रतिनिधी….. सामाजिक बांधिलकी जपत सर्व जाती-धर्मांतील विवाह इच्छुकांचे संसार थाटण्याचे कार्य करणारे श्रीगोंद्यातील…

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

July 3, 2026

शालेय साहित्याच्या निविदेविरोधात विकास साने आक्रमक; ‘डीबीटी’ धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

July 3, 2026

पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा

July 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?