Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

July 2, 2026

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»पिंपरी चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत – चेतन पवार 
महाराष्ट्र

पिंपरी चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत – चेतन पवार 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शेकडो शिवसैनिकांसह पवार यांची मातोश्री वर भेट 

पिंपरी, पुणे ( दि. २ जुलै २०२६)….. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनंतर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसोबत आहेत असा विश्वास शहर प्रमुख चेतन पवार यांनी मातोश्री येथे दिला.

गुरुवारी (दि. २ जुलै) सकाळी चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबईत मातोश्री वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शेकडो शिवसैनिक आणि युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षाशी निष्ठा कायम असल्याचे सांगितले. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे. यावेळी प्रमुख पदाधिकारी आणि चेतन पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षावर निष्ठा कायम असल्याची हमी दिली. पिंपरी चिंचवड शहरातील एकही शिवसैनिक किंव्हा पदाधिकारी पक्ष सोडणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत संघटनात्मक पातळीवर शाखा, बूथ स्तरावर जनसंपर्क वाढविणार आणि नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणार आहोत. शहर पातळीवर संघटना अधिक सक्षम करून पुढील काळात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून जोमाने काम करण्याचा निर्धारही सर्वांनी व्यक्त केला असल्याचे चेतन पवार यांनी सांगितले आहे.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमराठी भाषा ज्ञानभाषा बनण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल
Next Article पिंपरी-चिंचवडच्या जलसुरक्षेसाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करा; विधानसभेत जोरदार मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पावसात मृत्यूचा करंट! नेरूळमध्ये शॉर्टसर्किट; दोन विद्यार्थिनी जखमी, दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

July 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या जलसुरक्षेसाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करा; विधानसभेत जोरदार मागणी

July 2, 2026

मराठी भाषा ज्ञानभाषा बनण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

July 2, 2026

पुणे–नाशिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाला ‘साकडे’

July 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 20260

पिंपरी, दि.०३ जुलै (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी…

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्त प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा

July 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?