Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

July 2, 2026

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»पिंपरी-चिंचवडच्या जलसुरक्षेसाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करा; विधानसभेत जोरदार मागणी
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडच्या जलसुरक्षेसाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करा; विधानसभेत जोरदार मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, दि. ३ जुलै : पिंपरी-चिंचवड शहराच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी विधानभवनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे करण्यात आली.

शहराची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता हा प्रकल्प शहराच्या शाश्वत विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, विविध प्रशासकीय, न्यायालयीन, जमीन संपादन आणि आंदोलनांच्या कारणांमुळे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ हा प्रकल्प रखडल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

पवना धरण ते निगडी सेक्टर-२३ येथील जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान सुमारे ३६ किलोमीटर लांबीची आणि १८०० मिमी व्यासाची बंद जलवाहिनी उभारण्यासाठी २००८ मध्ये ३९७.९२ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे १७१ ते २०० कोटी रुपये खर्च होऊनही केवळ ४.५ ते ८ किलोमीटरचेच काम पूर्ण झाले असून सुमारे २८ ते ३२ किलोमीटरचे काम अद्याप प्रलंबित आहे. परिणामी, प्रकल्पाची सुधारित अंदाजित किंमत आता १,२०० ते १,७०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पवना धरणातून दररोज सुमारे ५१० ते ५३० एमएलडी पाणीपुरवठा होतो. बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खुल्या कालव्यातून होणारे बाष्पीभवन, पाण्याची गळती आणि अनधिकृत पाणीउपसा पूर्णपणे थांबवता येणार असून शहराला अतिरिक्त १०० एमएलडी पाणी उपलब्ध होईल. तसेच, दरवर्षी सुमारे १.२९ टीएमसी पाण्याची बचत होऊन भविष्यातील पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मंजुऱ्या तातडीने द्याव्यात आणि निश्चित कालमर्यादेत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना हक्काचे आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत – चेतन पवार 
Next Article पावसात मृत्यूचा करंट! नेरूळमध्ये शॉर्टसर्किट; दोन विद्यार्थिनी जखमी, दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पावसात मृत्यूचा करंट! नेरूळमध्ये शॉर्टसर्किट; दोन विद्यार्थिनी जखमी, दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

July 2, 2026

पिंपरी चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत – चेतन पवार 

July 2, 2026

मराठी भाषा ज्ञानभाषा बनण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

July 2, 2026

पुणे–नाशिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाला ‘साकडे’

July 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 20260

पिंपरी, दि.०३ जुलै (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी…

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्त प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा

July 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?