Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

July 2, 2026

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि.०३ जुलै (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील सुमारे १,२८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन १५ दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही पाठ्यपुस्तके उपलब्ध न झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांना तात्काळ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबरोबरच जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिका व आकांक्षा फाउंडेशन यांच्या माध्यमातून सन २०१३ पासून कै. अनुसया नामदेव वाघेरे इंग्लिश मिडियम शाळा, कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्लिश मिडियम शाळा आणि पीसीएमसी बोपखेल इंग्लिश मिडियम शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. या शाळांनी सातत्याने उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत दहावीचा १०० टक्के निकाल कायम राखला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

मात्र, मागील दोन वर्षांपासून शाळांकडून वेळेत मागणी करूनही संबंधित विभागाकडून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा वेळेवर होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यंदाही शाळा सुरू होऊन १५ दिवसांहून अधिक कालावधी लोटला असतानाही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळालेली नसल्याने नियमित अध्यापनावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वाघेरे यांनी नमूद केले आहे.

निवेदनात संबंधित विभागाला तातडीने सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत, तसेच वेळेत मागणी प्राप्त होऊनही पुरवठा न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

याबाबत नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, “गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हा या शाळांचा मूलभूत उद्देश आहे. मात्र, वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही. प्रशासनाने तात्काळ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्त प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा

July 2, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पालखी आगमनाची जय्यत तयारी

July 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 20260

पिंपरी, दि.०३ जुलै (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी…

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्त प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा

July 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?