Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

July 2, 2026

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पालखी आगमनाची जय्यत तयारी
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पालखी आगमनाची जय्यत तयारी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा

पिंपरी-चिंचवड, …..संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून पालखी मार्गाची आणि विविध विसावा ठिकाणांची महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि पालखी सोहळा अधिक शिस्तबद्ध व सुरळीत पार पडावा, या उद्देशाने आयुक्तांनी संबंधित विभागांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे,सहशहर अभियंता बापू गायकवाड,प्रभाग अधिकारी अतुल पाटील, निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, वैशाली ननावरे, कार्यकारी अभियंता विजय भोजने, उमेश मोने यांच्यासह महापालिकेचे विविध विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळी भक्ती-शक्ती चौकातून या पाहणीला सुरुवात झाली. यावेळी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाची पाहणी करून मेट्रोच्या कामामुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यानंतर विठ्ठलवाडी येथील हनुमान मंदिर व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील पालखी तळ, दर्शन रांग आणि मंडप व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मार्गावरील अनधिकृत टपऱ्या आणि रस्त्यांवर येणाऱ्या लहान व्यावसायिकांमुळे भाविकांना अडथळा निर्माण होऊ नये, याची विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

दरम्यान पालखी विसावा ठिकाणाची पाहणी करताना आयुक्तांनी मेट्रो कामाचे लावलेले बॅरिकेड्स हटवण्यासोबतच प्रकाश व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा चोख ठेवण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्याचा विचार करता मैदानावर चिखल होऊ नये म्हणून तात्काळ खडी टाकण्याचे आणि शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यानंतर आकुर्डीतील खंडोबा चौकात मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे पालखीला अडथळा येणार नाही याची खातरजमा करून, रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि झाडांच्या फांद्या छाटणे आदी कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचित केले.

तसेच दापोडी येथील संत तुकाराम महाराज पालखी विसावा स्थळाची पाहणी करून आयुक्तांनी समाधान व्यक्त करत आवश्यक त्या सुधारणांचे आदेश दिले. पालखी सोहळा हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय असल्याने, महापालिकेने आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा या सर्व सुविधा वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुण्यात डीपीला भीषण आग; फटाक्यांसारखे स्फोट, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
Next Article पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्त प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

July 2, 2026

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्त प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा

July 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 20260

पिंपरी, दि.०३ जुलै (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी…

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्त प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा

July 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?