Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

July 2, 2026

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा
पिंपरी चिंचवड

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि.०३ जुलै २०२६: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ च्या नियोजनासाठी महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

या बैठकीस प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मधुरा शिंदे, नगरसदस्य जितेंद्र ननावरे,तानाजी बारणे,धर्मपाल तंतरपाळे,बापू घोलप यांच्यासह माजी नगरसदस्य काळूराम पवार,कमल घोलप,भगवान शिंदे,उप आयुक्त अण्णा बोदडे,क्षेत्रीय अधिकारी निवेदीता घार्गे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे,संदीपान झोंबाडे,मनोज तोरडमल,सतीश भवाळ, संजय ससाणे, अरुण जोगदंड,नितीन घोलप,युवराज दाखले,चंद्रकांत लोंढे,आशाताई शहाणे,शशिकांत आढाव, मंगेश गायकवाड, अनिल शिंदे, श्रीमंत सावंत, अरुण डोंगरे, नागेश थोरात, गिरीश धोत्रे, तेजश्री शिंदे, श्रद्धेश, नामदेव शिंदे, सुरेश बोराडे, बाळासाहेब वंजुळे, मंगेश डगवारे, दीपाली एस. लोंढे, माया कैलास चौधरी, शिवाजी चव्हाण, किरण कांबळे आणि कृष्णा साबळे अनिल सोनवणे, कैलास पवार, विवेक ननावरे, शामा जगनाथ, गणेशी हरिश्चंद्र, प्रकाश जगन्नाथ, प्रसाद केसरे, आनंद कांबळे, विशाल कसबे, अनिता कांबळे, गणेश मोरे, सविता आढळे, अर्चना सोनवणे, रवींद्र वाघमारे, मयूर ढोले, शंकर खवळे, संजय बावणे आदी उपस्थित होते.

बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश अवघडे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी विचार प्रबोधन पर्व उत्साहात आणि लोकसहभागातून साजरा करण्याचे आवाहन केले.

बैठकीत सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी अनेक विधायक सूचना मांडल्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार होण्यासाठी शैक्षणिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे, विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला अशा स्पर्धा आयोजित कराव्यात तसेच युवक-युवतींसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवावेत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक परिसराचे सुशोभीकरण, अतिक्रमण हटविणे, स्मारकाजवळ आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, पालखी सोहळ्यादरम्यान योग्य नियोजन करणे आदी मागणीही बेठकीत करण्यात आली.

विचार प्रबोधन पर्वात होणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमात लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन व्हावे, त्याठिकाणी माहिती फलक लावण्यात यावेत, अशी सूचना करण्यात आली. तसेच पारंपरिक लोककलेला चालना देण्यासाठी पारंपरिक महोत्सव, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली.

बैठकीच्या शेवटी महापौर रवि लांडगे यांनी उपस्थितांनी मांडलेल्या सर्व सूचना व मागण्यांचा सकारात्मकपणे विचारात घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व अधिक भव्य, दिव्य आणि समाजप्रबोधन करण्यासाठी प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करेल असे सांगितले.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्त प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा
Next Article कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

July 2, 2026

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्त प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा

July 2, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पालखी आगमनाची जय्यत तयारी

July 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 20260

पिंपरी, दि.०३ जुलै (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या इंग्रजी…

कासारवाडीत नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

July 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ नियोजन बैठकीत विविध सूचना व मागण्यांवर चर्चा

July 2, 2026

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत धरणग्रस्त प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा

July 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?