Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

मराठी भाषा ज्ञानभाषा बनण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

July 2, 2026

पुणे–नाशिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाला ‘साकडे’

July 2, 2026

घराच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा लोखंडी रॉडने खून; आरोपी अटकेत

July 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»पुणे–नाशिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाला ‘साकडे’
महाराष्ट्र

पुणे–नाशिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाला ‘साकडे’

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडला औचित्याचा मुद्दा;PCMC व PMRDA मार्फत तात्पूरर्ता निधी उभारण्याची मागणी

मुंबई | प्रतिनिधी…पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड–राजगुरूनगर या महत्त्वाच्या मार्गाच्या रखडलेल्या भूसंपादन प्रक्रियेला तातडीने गती देण्याची मागणी विधानसभा सभागृहात औचित्याच्या मुद्याद्वारे करण्यात आली. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होईपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून भूसंपादनाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात केली.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार महेश लांडगे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, खेड-राजगुरूनगर तसेच राज्यातील प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रांना जोडणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या महामार्गाच्या रुंदीकरण व उन्नतीकरणासाठी प्रयत्न सुरू असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाचे एलिव्हेटेड कॉरिडॉरमध्ये रूपांतर करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियाही सुरू आहे.

मात्र, प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये भूसंपादनाचा प्रश्न सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून देण्यात आले. वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे नाशिक फाटा ते चाकण आणि खेड या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अवघे ३० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन तासांचा कालावधी लागत असून, त्यामुळे वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर, भूसंपादन प्रक्रियेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून निर्णय होईपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए यांनी त्यांच्या अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे रखडलेली भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या प्रकल्पाची वेळेत अंमलबजावणी झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच पिंपरी-चिंचवड, चाकण, खेड-राजगुरूनगर परिसरातील औद्योगिक, व्यापारी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळून नागरिक, उद्योजक आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असल्याचेही सभागृहात नमूद करण्यात आले.

“पुणे–नाशिक महामार्ग हा केवळ वाहतुकीचा मार्ग नसून पिंपरी-चिंचवड, चाकण, खेड-राजगुरूनगर आणि संपूर्ण औद्योगिक पट्ट्याच्या विकासाचा कणा आहे. रखडलेल्या भूसंपादनामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विलंबित होत आहे. राज्य शासन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए यांच्या समन्वयातून आवश्यक निधी उपलब्ध करून भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हावी, यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू राहील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल, उद्योगांना नवी गती मिळेल आणि लाखो नागरिकांचा वेळ, इंधन व आर्थिक खर्च वाचेल. नागरिकांच्या हितासाठी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे, हीच माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे.” 

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleघराच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा लोखंडी रॉडने खून; आरोपी अटकेत
Next Article मराठी भाषा ज्ञानभाषा बनण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

मराठी भाषा ज्ञानभाषा बनण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

July 2, 2026

प्राधिकरण ‘प्रॉपर्टी फ्री होल्ड’ निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा! आमदार महेश लांडगे यांचा सभागृहात औचित्याचा मुद्दा

July 1, 2026

पुणे शहरातील वृक्षगणनेच्या कामासंदर्भात विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांचा प्रश्न

July 1, 2026

१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

मराठी भाषा ज्ञानभाषा बनण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 2, 20260

मराठीत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विधान परिषदेत आमदार अमित…

पुणे–नाशिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाला ‘साकडे’

July 2, 2026

घराच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा लोखंडी रॉडने खून; आरोपी अटकेत

July 2, 2026

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त येरवडा परिसरातील डॉक्टरांचा भाजपतर्फे सत्कार

July 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?