पुणे : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त येरवडा, फुलेनगर आणि गांधीनगर परिसरातील डॉक्टरांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करून त्यांच्या रुग्णसेवेचा गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून तसेच पुणे शहराध्यक्ष व आमदार जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
यावेळी मंडल अध्यक्ष रमेश गव्हाणे, शहर सरचिटणीस (अ.जा. मोर्चा) दुर्गेश हातागळे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष शैलेश हिरणवार, सागरसिंग बाबरी, गणेश ढोकले, रोहित वैराळ यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात सरचिटणीस विकास मच्छिंद्र सोनवणे यांनीही सहभाग घेतला.
यावेळी डॉक्टरांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव करताना, “रुग्णसेवाच ही खरी ईश्वरसेवा” असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. डॉक्टरांनी ज्ञान, अनुभव, संवेदनशीलता आणि समर्पित भावनेने समाजाची केलेली सेवा ही प्रेरणादायी असून त्यांच्या निरपेक्ष सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सेवाकार्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
