Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

चिखली-मोशी परिसरात एसटी बस स्थानक उभारणार!

July 3, 2026

आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांच्याकडून पालखी मार्गावरील सुविधांची पाहणी

July 3, 2026

सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा; महावितरण कर्मचाऱ्यांवर कारवाईची सुहास कुदळे यांची मागणी

July 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»चिखली-मोशी परिसरात एसटी बस स्थानक उभारणार!
महाराष्ट्र

चिखली-मोशी परिसरात एसटी बस स्थानक उभारणार!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश;प्रवासी वाहतूक सक्षमीकरणासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

मुंबई | प्रतिनिधी….पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील चिखली किंवा मोशी येथे आधुनिक एसटी बस स्थानक उभारण्याच्या मागणीची राज्य शासनाने तातडीने दखल घेतली आहे. भाजपाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाला या प्रस्तावावर त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

आमदार महेश लांडगे यांनी दि. २५ जून रोजी परिवहन मंत्र्यांना निवेदन सादर करून चिखली किंवा मोशी परिसरातील आरक्षित जागेवर आधुनिक व सुसज्ज एसटी बस स्थानक उभारण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित प्रस्तावाची तातडीने तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिल्या आहेत. विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार लांडगे यांनी आज परिवहन मंत्री सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सकारात्मक निर्णय घेत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले.

या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना तातडीने निर्देश देत, पुणे विभाग नियंत्रकांमार्फत सर्वेक्षण करून चिखली किंवा मोशी परिसरातील योग्य ठिकाणी नवीन एसटी बस स्थानक उभारणीची कार्यवाही जलदगतीने करण्याचे आदेश दिले. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी बस स्थानकासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबतही संबंधित स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या दशकात चिखली, मोशी, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, तळवडे आणि स्पाईन रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. त्यामुळे या भागातील लाखो नागरिकांना आंतरजिल्हा व राज्यांतर्गत प्रवासासाठी शहरातील इतर एसटी बस स्थानकांवर अवलंबून राहावे लागते. नवीन बस स्थानक उभारल्यास नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होईल, तसेच शहरातील विद्यमान बस स्थानकांवरील ताणही कमी होणार आहे.

चिखली-मोशी परिसर हा पुणे-नाशिक महामार्गालगत असून, वाकड-हिंजवडी परिसर मुंबई-बंगळुरू महामार्गाशी जोडलेला आहे. त्यामुळे या दोन्ही भागांपैकी योग्य ठिकाणी एसटी बस स्थानक उभारल्यास उत्तर पिंपरी-चिंचवडसह औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रस्ताव पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“चिखली किंवा मोशी येथे आधुनिक एसटी बस स्थानक उभारण्याची मागणी ही पिंपरी-चिंचवडसह उत्तर पुणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मागणीची तातडीने दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला त्वरीत कार्यवाहीचे निर्देश दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या बस स्थानकामुळे नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासी सेवा मिळेल. हा प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा, यासाठी शासन आणि संबंधित यंत्रणांकडे मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांच्याकडून पालखी मार्गावरील सुविधांची पाहणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडच्या जलसुरक्षेसाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करा; विधानसभेत जोरदार मागणी

July 2, 2026

पिंपरी चिंचवडचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत – चेतन पवार 

July 2, 2026

मराठी भाषा ज्ञानभाषा बनण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

July 2, 2026

पुणे–नाशिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाला ‘साकडे’

July 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

चिखली-मोशी परिसरात एसटी बस स्थानक उभारणार!

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 3, 20260

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश;प्रवासी वाहतूक सक्षमीकरणासाठी भाजपा आमदार महेश लांडगे…

आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांच्याकडून पालखी मार्गावरील सुविधांची पाहणी

July 3, 2026

सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा; महावितरण कर्मचाऱ्यांवर कारवाईची सुहास कुदळे यांची मागणी

July 3, 2026

इंद्रायणी नदी पुनर्जीवनाच्या ४४३ कोटींच्या प्रकल्पाला स्थगिती द्या; मारुती भापकर यांची महापालिकेकडे मागणी

July 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?