Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सर्वधर्मीय १६०० विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरव

July 3, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

July 3, 2026

शालेय साहित्याच्या निविदेविरोधात विकास साने आक्रमक; ‘डीबीटी’ धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

July 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»शालेय साहित्याच्या निविदेविरोधात विकास साने आक्रमक; ‘डीबीटी’ धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

शालेय साहित्याच्या निविदेविरोधात विकास साने आक्रमक; ‘डीबीटी’ धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 3, 2026Updated:July 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २ जुलै (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शालेय साहित्य खरेदीसाठी काढलेली निविदा महाराष्ट्र शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) धोरणाच्या विरोधात असल्याचा आरोप करत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य विकास साने यांनी ही निविदा तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा या विषयावर तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत साने यांनी प्रशासनाला जाब विचारला. बैठकीला आयुक्त, अतिरिक्त आयुक्त ममता शिंदे, वरिष्ठ अधिकारी तसेच स्थायी समितीचे सभापती व सदस्य उपस्थित होते. डीबीटी धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांना प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

साने यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या ५ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तूंचे थेट वाटप करण्याऐवजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची तरतूद आहे. त्यानुसार पालकांनी आपल्या पसंतीचे शालेय साहित्य स्थानिक बाजारातून खरेदी करावे, अशी स्पष्ट कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे.

मात्र, महानगरपालिकेने या धोरणाला बगल देत शालेय साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पालकांच्या पसंतीचा अधिकार हिरावला जात असून स्थानिक स्टेशनरी व्यावसायिकांनाही व्यवसायापासून वंचित राहावे लागणार असल्याचे साने यांनी नमूद केले.

डीबीटी धोरणाचा उद्देश पारदर्शकता, लाभार्थ्याला निवडीचे स्वातंत्र्य आणि स्थानिक बाजारपेठेला चालना देणे हा आहे. मात्र, निविदा प्रक्रियेमुळे या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची टीका त्यांनी केली.

याशिवाय, डीबीटी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अशा प्रकारची निविदा प्रक्रिया राबविण्यास शासनाची कोणतीही स्पष्ट परवानगी नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. शासनाची मंजुरी नसताना निविदा अथवा दरपत्रक (आरएफपी) मागविण्याचा अधिकार महानगरपालिकेला कोणी दिला, असा सवालही त्यांनी केला.

“शासनाचे डीबीटी धोरण अस्तित्वात असताना त्यालाच निविदेचे स्वरूप देणे ही चुकीची बाब आहे. यामुळे पालक, विद्यार्थी आणि स्थानिक व्यावसायिकांचे नुकसान होईल, तर काही मोजक्या ठेकेदारांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तात्काळ रद्द करून शासनाच्या डीबीटी धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी,” 

….विकास साने,नगरसेवक पिंपरी चिंचवड.

शालेय साहित्य खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली निविदा प्रक्रिया त्वरित रद्द करून शासनाच्या मूळ निर्णयानुसार पालकांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्यात यावे, अन्यथा या प्रश्नावर व्यापक लोकआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा
Next Article पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांच्याकडून पालखी मार्गावरील सुविधांची पाहणी

July 3, 2026

सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा; महावितरण कर्मचाऱ्यांवर कारवाईची सुहास कुदळे यांची मागणी

July 3, 2026

इंद्रायणी नदी पुनर्जीवनाच्या ४४३ कोटींच्या प्रकल्पाला स्थगिती द्या; मारुती भापकर यांची महापालिकेकडे मागणी

July 3, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळांतील १,२८० विद्यार्थ्यांना अद्याप पाठ्यपुस्तके नाहीत; संदीप वाघेरे यांची कारवाईची मागणी

July 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मनोरंजन

सर्वधर्मीय १६०० विवाह जुळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढवळे यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरव

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 3, 20260

अहिल्यानगर (श्रीगोंदा) प्रतिनिधी….. सामाजिक बांधिलकी जपत सर्व जाती-धर्मांतील विवाह इच्छुकांचे संसार थाटण्याचे कार्य करणारे श्रीगोंद्यातील…

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून २.६४ कोटींचे अंमली पदार्थ नष्ट

July 3, 2026

शालेय साहित्याच्या निविदेविरोधात विकास साने आक्रमक; ‘डीबीटी’ धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

July 3, 2026

पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा

July 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?