Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व पूर्व परीक्षा आता सीबीटी पद्धतीने ;२१ दिवसांत निकाल, वर्षाअखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार
महाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व पूर्व परीक्षा आता सीबीटी पद्धतीने ;२१ दिवसांत निकाल, वर्षाअखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 26, 2026Updated:June 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई,दिं.२६ जून,  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्व आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. परीक्षांतील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगाने व्यापक सुधारणा सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अध्यक्ष भीमनवार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर व परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर – देशमुख उपस्थित होते.

अध्यक्ष भीमनवार म्हणाले की, यापूर्वी परीक्षांचे निकाल आणि पुढील टप्प्यांमध्ये मोठा विलंब होत असल्याने उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी आयोगाने पूर्व परीक्षांचे निकाल २१ दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अवघ्या २२ दिवसांत प्रसिद्ध करण्यात आला असून, यापुढे सर्व पूर्व परीक्षांचे निकाल २१ दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय, ज्या वर्षी परीक्षा होईल, त्याच वर्षात तिची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य आयोगाने निश्चित केले आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया ९ ते ११ महिन्यांत, तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया ६ ते ७ महिन्यांत पूर्ण केली जाईल. यामुळे उमेदवारांना निश्चितता मिळून त्यांच्या करिअरवरील अनिश्चितता कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्ष भीमनवार यांनी स्पष्ट केले की, सीबीटी पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू असेल. राज्यसेवा, गट ‘अ’, गट ‘ब’, किवा गट ‘क’ च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीबीटी आणि नॉर्मलायझेशन ही नवी पद्धत नसून, लोकसेवा आयोगाने आतापर्यंत सुमारे १४० परीक्षा सीबीटी प्रणाली नुसार यशस्वीपणे घेतल्या आहेत. सीबीटी प्रणाली ही वैज्ञानिक, न्यायालयाने मान्यता दिलेली आणि देशभरात स्वीकारलेली पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील विविध भरती संस्थांचा दाखला देताना त्यांनी सांगितले की, स्टाफ सिलेक्शन कमिशन दरवर्षी लाखो उमेदवारांच्या परीक्षा सीबीटी आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने घेते. तसेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ने सुमारे १ कोटी उमेदवारांची भरती परीक्षा याच पद्धतीने यशस्वीपणे घेतली आहे. महाराष्ट्रातील स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल (सीईटी) कडूनही अलीकडे १६.३० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा सीबीटी आणि नॉर्मलायझेशनद्वारे घेण्यात आली. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्येही हीच पद्धत वापरली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

सीबीटी पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल तसेच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल, असा विश्वास अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
Next Article श्रीमती स्मिता कवडे,श्री विजय जाधव व श्री महादेव गोठणकर यांना यावर्षीचा “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६” जाहीर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘एक अटल भारत’ नाटकाद्वारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

August 10, 2026

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार ….मंत्री प्रकाश आबिटकर

August 8, 2026

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी ….केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

August 8, 2026

‘दादा’ : शिक्षणातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारा महामानव – डॉ.भरत चव्हाण पाटील

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?