Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»धाराशिव जिल्ह्यातील शहीद अविनाश खंडागळे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही – लोकसेवक युवराज दाखले
पुणे

धाराशिव जिल्ह्यातील शहीद अविनाश खंडागळे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही – लोकसेवक युवराज दाखले

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड, दि. २२ जून २०२६ : धाराशिव जिल्ह्यातील मातंग समाजातील तरुण स्व. अविनाश खंडागळे यांनी आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी प्राणत्याग केल्याची घटना अत्यंत वेदनादायी असून, हे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असा ठाम इशारा हिंदू मातंग सेना व शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे मातंग समाजबांधवांना भावनिक आवाहन केले आहे.

युवराज दाखले यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “बंधूंनो, अविनाश दादा शहीद झाला, त्याचे रक्त सांडले; मात्र मी हात जोडून विनंती करतो की, असे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये. आपण आरक्षणाची लढाई त्याच्यासाठी आणि समाजाच्या भविष्यासाठी लढत आहोत. तो गेल्यानंतर आरक्षणाचा उपयोग काय? त्यामुळे समाजातील कुणीही आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारू नये.”

दाखले यांनी पुढे सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी आरक्षण वर्गीकरणाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता ही लढाई न्यायालयीन, घटनात्मक आणि लोकशाही मार्गानेच पुढे नेली जाईल. “मातंग समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही; मात्र हा संघर्ष जिवंत राहून करायचा आहे, मरून नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दाखले यांनी शासनालाही कडक इशारा देत मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात तातडीने आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. “जर शासनाने दुर्लक्ष केले आणि भविष्यात अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडल्या, तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी स्व. अविनाश खंडागळे यांच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची भूमिका जाहीर केली. “अविनाश दादाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, ही आता आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मातंग समाजबांधवांना युवराज दाखले यांचे आवाहन

💮जीव महत्त्वाचा आहे : अविनाश दादा गेला, आता दुसरा कोणीही जाऊ द्यायचा नाही. समाजात जनजागृती करा.

💮कायदेशीर लढा उभारा : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने आहे. आयोग, आंदोलन आणि न्यायालयीन मार्गाने संघर्ष सुरू ठेवू.

💮 एफआयआर दाखल करा : उपवर्गीकरणाला विरोध करणारे कपिल के. सरोदे, राजू चाटे व इतर विरोधक तसेच शासन यांनाही जबाबदार धरावे

दाखले यांनी शेवटी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या विचारांची आठवण करून दिली. “शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश देत त्यांनी मातंग समाजाला आत्महत्येऐवजी संघटित आणि घटनात्मक संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. “अविनाश दादाच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण जिवंत राहू, लढू आणि न्याय मिळवू,” असे आवाहन त्यांनी केले.

Post Views: 29
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांचा पाठपुरावा यशस्वी
Next Article शालेय स्तरापासून योगाचे धडे देणे काळाची गरज – आमदार शंकर जगताप
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?