पिंपरी चिंचवड.….पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दिनांक २१ जून २०२६ रोजी “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पोलीस मुख्यालय, निगडी येथे सकाळी ०६.३० ते ०७.३० या वेळेत पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी विशेष योग, प्राणायाम व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले.
मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री. विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश पोलीस अधिकारी व अंमलदारांचे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य सुदृढ करणे, तसेच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणणे हा होता. समाजसेवेत सातत्याने कार्यरत असलेल्या पोलीस दलावरील ताणतणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी या सत्राचा लाभ झाला.
सदर कार्यक्रम कैवल्यधाम, पुणे येथील अनुभवी व अधिकृत योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एकूण २०९ पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांनी नियमित योगाभ्यासाद्वारे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२ व ०३, विशेष शाखा व मुख्यालय, तसेच सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. कैवल्यधामचे योग प्रशिक्षक यांनी योग, प्राणायाम व ध्यानाचे महत्त्व तसेच त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
