Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अधिक परताव्याच्या आमिषाने ५ कोटींचा गंडा!
पिंपरी चिंचवड

अधिक परताव्याच्या आमिषाने ५ कोटींचा गंडा!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 21, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शेअर बाजार आणि भिशीमध्ये गुंतवणूकदारांना महिन्याला ५ टक्के परताव्याचे स्वप्न दाखवून फसवणूक; एकाच कुटुंबातील चौघे आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पिंपरी, दि. २१ जून – शेअर मार्केटमध्ये कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे, तसेच भिशीमध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा ४ ते ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना तब्बल ५ कोटी ३ लाख १४ हजार ३६८ रुपयांचा गंडा घालणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे गुंतवणुकीच्या नावाखाली उभा करण्यात आलेला मोठा फसवणुकीचा डाव उघडकीस आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रमेश पुंजा आहेरकर, छाया रमेश आहेरकर, वेदांत रमेश आहेरकर आणि आदित्य रमेश आहेरकर यांचा समावेश आहे. आरोपींनी ‘वेदांत फायनान्स सर्व्हिसेस’, ‘त्रिवेणी पूजा भांडार’ आणि ‘आदित्य इंटरप्रायझेस’ या फर्मच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांना “शेअर मार्केटमध्ये सुरक्षित गुंतवणूक”, “भिशीत मोठा नफा” आणि “नियमित मासिक परतावा” अशा गोड बोलांनी भुरळ घातली. गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उभी केल्यानंतर कोणताही परतावा न देता विश्वासघात करण्यात आला. या प्रकरणात फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांची ४ कोटी १८ लाख २० हजार ८९० रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे; तर एकूण व्यवहाराची रक्कम ५.०३ कोटींवर गेल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी हनुमंत भागवत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४३/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११२, ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच आरोपींनी हिंजवडी येथील राहते घर बंद करून आपले अस्तित्व लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि कसून तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत नेवासा, जि. अहिल्यानगर येथून चौघांनाही अटक केली. न्यायालयाने त्यांना २२ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

तपासादरम्यान आरोपींच्या वेदांत फायनान्शियल सर्व्हिसेस आणि आदित्य इंटरप्रायझेस या फर्मसह इतर वैयक्तिक अशा एकूण ११ बँक खाती डेबिट फ्रीज करण्यात आली आहेत. याशिवाय आरोपींच्या चल-अचल मालमत्तेचा शोध घेण्याचे कामही आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे फसवणुकीतून उभारलेली मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची साखळी उलगडण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात जाहीर आवाहन केले असून, ‘वेदांत फायनान्स सर्व्हिसेस’, ‘त्रिवेणी पूजा भांडार’ किंवा ‘आदित्य इंटरप्रायझेस’ या फर्ममार्फत कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तातडीने आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कारवाईत आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, पोलीस निरीक्षक सचिन शिर्के, सहायक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर सोनटक्के, आकाश पारधी आणि प्रिया वसावे यांनी मोलाची भूमिका बजावली.

या कारवाईनंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. “शेअर मार्केटमध्ये कमी कालावधीत प्रचंड नफा, अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा किंवा अनधिकृत भिशी योजनांचे आमिष दाखवले जात असेल, तर नागरिकांनी अशा योजनांपासून दूर राहावे. गुंतवणुकीपूर्वी संबंधित संस्था, फर्म किंवा व्यक्तीची संपूर्ण पडताळणी करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपळे सौदागरमध्ये भजनाच्या ठेक्यावर रंगली योगसाधना
Next Article पुणेकरांना पावसाचा दिलासा; रविवारी हलक्या सरींनी उकाड्यातून दिली काहीशी सुटका
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?