Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व योग विद्या धाम यांच्या संयुक्त विद्यमाने योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व योग विद्या धाम यांच्या संयुक्त विद्यमाने योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २१ जून २०२६ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि योग विद्या धाम, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष योगाभ्यास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून योगाभ्यास केला.

कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमास नगरसेविका अनुराधा गोरखे,उपआयुक्त पंकज पाटील,क्रीडा अधिकारी दिपक कन्हेरे,प्रशासन अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी,योग विद्या धाम, निगडीचे प्रमुख प्रमोद निफाडकर, योगिनीज योगा क्लासेसच्या संचालिका योगिता तरडे तसेच छत्रपती पुरस्कार विजेत्या शीतल मारणे उपस्थित होते. त्यानंतर ओंकार उच्चारण व प्रार्थनेद्वारे योग सत्राला प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात योगाचे महत्त्व, निरोगी जीवनासाठी योगाची आवश्यकता तसेच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जपण्यात योगाचे योगदान याविषयी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

यावेळी योगाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी आणि भारतीय संस्कृतीतील या अमूल्य परंपरेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांचेही यावेळी स्मरण करण्यात आले.

योग विद्या धामच्या वतीने विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. उपस्थित मान्यवर तसेच नागरिकांनीही योगाभ्यासात सक्रिय सहभाग घेतला. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी आणि संतुलित जीवनशैली घडण्यास मदत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा असून निरोगी जीवनाचा भक्कम पाया आहे. प्रत्येक नागरिकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन कैलास कुटे यांनी यावेळी केले.

तर “योग” ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी समाज घडविण्यास हातभार लावावा असे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपरभणीच्या मानवतमधील यशवाडी हनुमान मंदिरात भीषण दुर्घटना
Next Article “निरोगी आरोग्य व वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?