Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मानधनावरील नर्सेसना न्याय देण्याची महापौर रवि लांडगे आणि स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांची ग्वाही – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले 
पिंपरी चिंचवड

मानधनावरील नर्सेसना न्याय देण्याची महापौर रवि लांडगे आणि स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांची ग्वाही – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 19, 2026Updated:June 20, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी(प्रतिनिधी) दिनांक १९ जून २०२६:-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल (YCM) आणि इतर वैद्यकीय विभागांमध्ये गेली १५ ते १८ वर्षे अवघ्या १० ते १५ हजार रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या १४२ नर्सेस आणि टेक्निकल स्टाफला कायमस्वरूपी (परमनंट) करण्याऐवजी, त्यांच्या हक्काच्या जागेवर नवीन भरती करण्याचा घाट तत्कालीन प्रशासनाने घातला होता. मात्र, राष्ट्रीय श्रमिक आघाडीने या अन्यायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत नवीन भरतीला स्थगिती मिळवली आहे. आता या भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी महापौर रवी लांडगे आणि स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले असता दोघांनी मानधनावरील नर्सेसना न्याय देण्याची ग्वाही दिली तसेच शहरातील आमदार, खासदार व सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पिंपरी येथे (दि.१९) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, या परिचारिकांनी आपल्या आयुष्याची १८ वर्षे पालिके सेवेत घालवली आहेत. २०२० मधील कोरोनाच्या भयानक महामारीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, तीन-तीन महिने घराचे तोंड न पाहता त्यांनी रात्रंदिवस सेवा केली. कित्येक नर्सेस तिथेच आजारी पडल्या, ॲडमिट झाल्या आणि बऱ्या होऊन पुन्हा कामावर हजर झाल्या. त्यांच्या या त्यागाची दखल घेऊन २०२० मध्ये महापालिका सभागृहाने या सर्व नर्सेसना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक ठराव मंजूर केला आणि तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला.परंतु, नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पालिकेवर प्रशासक नियुक्त झाले. तत्कालीन प्रशासक शेखर सिंग यांनी लोकप्रतिनिधींच्या या सर्वोच्च सभागृहाच्या ठरावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे, तर तो ठरावच विखंडित (रद्द) करून नर्सेसच्या जागांवर नवीन भरतीचा प्रस्ताव सरकारला पाठवला. समान काम करणाऱ्या इतर परमनंट सिस्टर्सना सातव्या वेतन आयोगानुसार ८० हजार रुपये पगार व सर्व सुविधा मिळत असताना, गेली १८ वर्षे सेवा देणाऱ्या या नर्सेसना मात्र २१ ते २२ हजारांवर राबवले जात आहे आणि आता त्यांनाच कामावरून काढून नवीन मुलींची भरती करण्याचा हा डाव अत्यंत अन्यायकारक होता, असे भोसले म्हणाले.

प्रशासकाच्या या हुकूमशाही निर्णयाविरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीने तातडीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत नवीन भरतीला स्थगिती दिली, तसेच या कर्मचाऱ्यांना कामावरून न काढण्याचे आणि मूळ ठरावावर त्वरित निर्णय घेण्याचे आदेश दिले.

सभागृह हे सर्वोच्च असताना एका काळजीवाहू प्रशासकाने तो ठराव कोणत्या अधिकारात विखंडित केला, असा सवाल उपस्थित करत उच्च न्यायालयाने प्रशासकाला तात्काळ ‘रिप्लाय फाईल’ करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तो रिप्लाय फाईल करण्यापूर्वीच शेखर सिंग यांची बदली झाली.

शहराचे भाग्य चांगले की आता प्रशासकीय राजवट संपून सामाजिक जाण असणारे लोकप्रतिनिधी महापालिकेत निवडून आले आहेत. तरुण व तडफदार महापौर रवीजी लांडगे साहेब, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे साहेब, उपमहापौर शर्मीलाताई बाबर तसेच पक्षनेते प्रशांत शितोळे यांची भेट घेतली आहे. प्रशासकाने विखंडित केलेला तो जुना ठराव रद्द करून, नर्सेसना कायम करण्याचा मूळ ठराव पुन्हा मंजूर करून घ्यावा, अशी विनंती केली आहे. यावर महापौरांनी सकारात्मकता दर्शवली असून लवकरच याबाबत आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर जगताप, विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे,आमदार उमा खापरे आणि सर्व नगरसेवक तसेच सर्व लोकप्रतिनिधी मानधनावरील नर्सेसना सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी सुरक्षित ठेवावी; यशवंतभाऊ भोसले यांची महापौर व स्थायी समितीचे सभापती यांच्याकडे मागणी!
Next Article पांडुरंग कदम यांची माथाडी कामगार संघाच्या ट्रान्सपोर्ट नगर निगडी विभाग प्रमुखपदी नियुक्ती; महेश लांडगे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?