Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार 
पिंपरी चिंचवड

मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 18, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा

पिंपरी दिं.१८ जून…..पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दुकानातील आरक्षित भूखंड भाडेतत्त्वावर देत आहोत असा फलक मनपा भवनावर लावावा, तसेच ज्या संस्थेला व ज्या मोठ्या कारभाऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी त्वरित लाभ घ्यावा, असेही आवाहन आयुक्त यांनी करावे अशी उपरोधित टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख चेतन पवार यांनी केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि शिक्षण विभागात असणारा भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वेळोवेळी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या या प्रशासनाला जागे करण्यासाठी गुरुवारी जागर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना चेतन पवार यांनी सांगितले की, पुनावळे येथील मनपा शाळेसाठी आरक्षित भूखंड खाजगी संस्थेला देऊ नये. तिथे गोरगरिबांच्या मुलांसाठी मनपाने शाळा सुरू करावी. या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा आयुक्तांना पत्र देऊन, पत्रकार परिषद घेऊन देखील विरोध दर्शविण्यात आला होता. तरी देखील सोमवारी सर्वसाधारण सभेत तुटपुंज्या रकमेवर ९१ गुंठ्यांचा हा आरक्षित भूखंड ३० वर्षाच्या मुदतीवर नाममात्र भाडेकराराने देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून सभागृहात विरोध करायला हवा होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपची बी टीम असल्याने त्यांनी विरोध केला नाही आणि बहुमताच्या जोरावर या प्रशासनाने ठराव मंजूर केला. यासाठी कोणत्या आमदारांचा, वरिष्ठांचा दबाव होता हे आयुक्तांनी जाहीर करावे आणि या मनपा हद्दीतील उर्वरित सर्व भूखंड देखील मोठ्या कारभाऱ्यांना आणि त्यांच्या संस्थेला देण्यासाठी आरक्षित भूखंड भाड्याने देण्याचे दुकान उघडल्याचा फलक मनपा भवनावर लावावा असे चेतन पवार यांनी सांगितले.

तसेच दापोडी येथील सर्वे नंबर १६,१७ मधील क्रीडांगणाचे आरक्षण मनपाने ताबडतोब विकसित करावे, हे आरक्षण देखील खासगी संस्थेला किंवा कारभाऱ्यांना देण्याची भीती आहे. ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळा मनपा शिक्षण विभागाकडे वर्ग करून शिक्षण विभागाने तेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खेळाचे साहित्य, ग्रंथालय, प्रयोगशाळा उपलब्ध करून द्यावी.

मनपा शिक्षण विभागाच्या वतीने मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेश आणि शालेय साहित्य याची फेरनिविदा काढावी. पवना, इंद्रायणी नदी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर, आस्थापनांवर आणि याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. ताथवडे येथे बांधकाम राडारोडा टाकण्यासाठी आरक्षित असणाऱ्या जागेवर कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. तेथे कचरा टाकने बंद करावे. शहरातील सर्वच नाल्यांची साफसफाई करावी.

ताथवडे येथे (सर्वे नंबर ६४/२/१) “ड” प्रभाग कडून खासगी कन्सल्टंट चा अभिप्राय घेऊन नाला शिफ्ट करण्यात आला. तेथे नाला वळविण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. येथील नागरिकांना त्रास देऊन हे सर्व बिल्डर च्या फायद्यासाठी केले आहे. या प्रकल्पाचा बांधकाम परवाना ताबडतोब रद्द करावा अशी मागणी येथील नागरिकांची आहे.

या जागर मोर्चा पारंपरिक वाद्यांचा गजर करीत पोतराजाचा वेष परिधान करून प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या मोर्चामध्ये सर्व निष्ठावंत शिवसैनिक आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआंतरजिल्हा दरोडा टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Next Article मुंबई-पुणे महामार्गावरील विकासकामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून पाहणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?