Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»रावेत पोलिसांची धडाकेबाज कारवाई
पिंपरी चिंचवड

रावेत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सोनसाखळी चोऱ्या (चैन स्नॅचिंग) करणारी टोळी जेरबंद, २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी, दि.१७ जून : रावेत परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत चैन स्नॅचर टोळीचा पर्दाफाश करण्यात रावेत पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये दाखल करण्यात आला होता. फिर्यादी कविता मिलिंद केसरकर (वय ५५) या २ जून २०२६ रोजी सायंकाळी पतीसोबत पायी फिरत असताना नव्यम कन्स्ट्रक्शन साईटजवळ अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण हिसकावून नेले होते.

या गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. पोलीस शिपाई अजित बेंडभर व विनोद कदम यांनी आरोपींचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आदित्य परशुराम मनलोर (वय १९, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) आणि त्याचा साथीदार फिदा मनुआली इराणी (वय ३५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) यांनी दुचाकी क्रमांक KA-38-EA-8929 चा वापर करून रावेत परिसरात दोन चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून रावेत पोलीस ठाण्यातील दोन चैन स्नॅचिंग प्रकरणांतील १ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच कर्नाटक राज्यातील बिदर ग्रामीण पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरी प्रकरणातील एक लाख रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तपासात आरोपींनी हिंजवडी, तळेगाव दाभाडे, विश्रांतवाडी तसेच बिदर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे केल्याचेही उघड झाले आहे. आदित्य मनलोर याच्याविरुद्ध यापूर्वी मोबाईल स्नॅचिंग आणि चैन स्नॅचिंगचे सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे, संतोष कोळगे, आशिष बोटके, गोविंद चव्हाण, विनायक मराठे, प्रदीप गायकवाड, अजित बेंडभर, सौदागर लामतुरे, विनोद कदम व निखील कपले यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleथोर पराक्रमी राजे महाराणा प्रतापसिंह यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी दिलेले योगदान भारतीय इतिहासात अजरामर -उपमहापौर शर्मिला बाबर
Next Article महानगरपालिकेची अधिकृत डायरी पुन्हा सुरू करण्याची भाऊसाहेब भोईर यांची मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?