Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत महापालिकेत आढावा बैठक संपन्न
पिंपरी चिंचवड

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत महापालिकेत आढावा बैठक संपन्न

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 16, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या सूचना

पिंपरी, दि.१७ जून  : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच सर्व आवश्यक सुविधा नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीत पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा तसेच वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. पालखी मार्गावर येणाऱ्या वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

आषाढी वारी पालखी सोहळा हा राज्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होत असतात. त्यामुळे पालखी मार्गावरील सर्व यंत्रणांनी आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करून कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

यावेळी पालखी मार्गावरील वाहतूक नियोजन, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना, स्वच्छता व्यवस्थापन, आरोग्य सेवांची उपलब्धता तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पालखी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीस महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, नगरसदस्य बापू घोलप, उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता अनिलल भालसाखळे, महेश कावळे, उप आयुक्त अण्णा बोदडे, प्रदीप ठेंगल, अतुल पाटील, व्यंकटेश दुर्वास, ममता शिंदे, राजेश आगळे, चेतना केरूरे, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, परशुराम वाघमोडे, अजिंक्य येळे, पूजा दुधनाळे, अश्विनी गायकवाड, सहाय्यक आयुक्त उमा दर्वेश, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे,पोलीस उप आयुक्त विक्रांत देशमुख, धिरज पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांच्यासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश नांदुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे, महेश बनसोडे, विनोद पाटील, वर्षाराणी पाटील, गोरख कुंभार, प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ महानवर, ज्ञानेश्वर धनगर, मोटार वाहन निरीक्षक विजय चौधरी, महामेट्रोचे चीफ डेव्हलपटमेंट मॅनेजर संदीप दुबे, चीफ रेसिडेंट इंजिनीअर यतेंद्र कुलकर्णी, देहू संस्थान विश्वस्त ह. भ. प. उमेश मोरे, आळंदी संस्थान विश्वस्त ॲड. रोहिणी पवार, चैतन्य कबीर महाराज, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ऍड. राजेंद्र उमाप यांच्यासह महावितरण तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 वारकऱ्यांच्या सेवेसाठी महापालिका सज्ज

आषाढी वारी पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून आवश्यक नियोजन करण्यात येत असून स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेसह विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष तयारी करण्यात येत आहे.

“आषाढी वारी पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. वारकरी भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असून सर्व विभागांच्या समन्वयातून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे”

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वाहतूक, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थेचे सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सोहळा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे”

– डॉ. विजय सूर्यवंशी,आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागात गैरकारभाराचा आरोप; चौकशी व कारवाईची मागणी
Next Article “सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन” हा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या दिव्यांग कलाकार,गायिका अबोली जरीत यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?