Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»महापालिकेच्या सभांचे लाईव्ह प्रक्षेपण बंद; प्रशासनाला कायदेशीर नोटीस
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या सभांचे लाईव्ह प्रक्षेपण बंद; प्रशासनाला कायदेशीर नोटीस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 3412; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 65.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
१५ दिवसांत निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

पिंपरी-चिंचवड, दि. १५ जून : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती तसेच विशेष सभांचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) बंद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात महापालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. १५ दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिला.

यासंदर्भात सोमवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे आणि नगरसेवक संदीप वाघेरे यांनी भूमिका स्पष्ट केली. वाघेरे यांच्या वतीने पाठविण्यात आलेल्या नोटिशीत महापालिकेच्या सर्व महत्त्वाच्या बैठका नागरिकांसाठी ऑनलाइन थेट प्रसारित करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या कामकाजाची माहिती मिळणे हा लोकशाही व्यवस्थेतील मूलभूत अधिकार असल्याचे सांगत, थेट प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय पारदर्शक प्रशासनाच्या तत्त्वांशी विसंगत असल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे. याबाबत ॲड. असीम सरोदे यांनी माहिती दिली.

नोटिशीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ४ तसेच डिजिटल प्रशासन आणि पारदर्शकतेसंदर्भातील राज्य शासनाच्या धोरणांचा संदर्भ देण्यात आला आहे. महापालिकेच्या बैठका पुन्हा सुरू करण्याबरोबरच यापूर्वी झालेल्या सभांचे व्हिडिओ संग्रहित करून नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत कोणतीही सकारात्मक कार्यवाही न झाल्यास न्यायालयीन लढा उभारला जाईल, असे वाघेरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण बंद झाल्यानंतर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कायदेशीर नोटिशीनंतर प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या नोटिशीवर ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रिया आवळे, ॲड. तृप्ती गायकवाड आणि ॲड. आर्या राजे भोसले यांच्या स्वाक्षऱ्या असून, नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने ही कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण; भारत-मॉरिशस मैत्रीचा नवा अध्याय
Next Article करवाढीच्या प्रस्तावाला अखेर ब्रेक; विकास साने यांच्या पाठपुराव्याला यश
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

पिंपरी प्रतिनिधी : संत तुकाराम व्यापारी संकुल, निगडी येथील शांता शेळके सभागृहासाठी ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक,…

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?