Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; पिकअप विहिरीत कोसळून १४ भाविकांचा मृत्यू
महाराष्ट्र

देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; पिकअप विहिरीत कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सोलापूर | प्रतिनिधी…संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी अत्यंत भीषण दुर्घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडली आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांनी भरलेले पिकअप वाहन रस्त्यालगतच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दोन जणांना जीव वाचवण्यात यश आले असून मृतांमध्ये चार लहान मुले आणि चार महिलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना तांदूळवाडी गावाच्या शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला असलेल्या आणि पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीला कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने पिकअप थेट विहिरीत कोसळले.

विहीर पूर्णपणे भरलेली असल्यामुळे वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. परिणामी १४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेत केवळ दोन जण बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या बचावकार्यात विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

घटनेची माहिती मिळताच उत्तम जाणकर यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची पाहणी केली. तसेच जयकुमार गोरे यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. रस्त्यालगतच्या विहिरीला संरक्षक कठडे का नव्हते, यासह सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येईल. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.”

सध्या पोलीस व प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून वाहन आणि उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड मालमत्ता पोलिसांची मोठी कारवाई
Next Article ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?