Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र

ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 14, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

ठाणे, दि. १४ जून: अंबरनाथ तालुक्यात उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने रविवारी धडक कारवाई करत सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अवैध इंधन साठवणूक आणि काळाबाजाराविरोधातील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.

नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.) यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे राज्य दक्षता पथकाने अंबरनाथ येथील उसाटणे भागातील न्यूओ लॉजिस्टिक पार्क परिसरात, राज्यस्तरीय प्लॉट क्रमांक २० समोर छापा टाकला. कारवाईदरम्यान टँकरचे सील तोडून ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ची बेकायदेशीर साठवणूक व देवाणघेवाण सुरू असल्याचे उघडकीस आले. दोन व्यक्ती या प्रकारात प्रत्यक्ष सहभागी असल्याचे आढळून आले

पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता GJ-12 BY-7560 क्रमांकाचा टँकर पूर्णपणे भरलेला आढळला. या टँकरमध्ये सुमारे २९ हजार ७०० किलो मिक्स हायड्रोकार्बन ऑईल असल्याचे निदर्शनास आले. तसेच MH-43 E-190 क्रमांकाचा आणखी एक टँकर घटनास्थळी उभा असून त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने इंधन साठवण्याचे काम सुरू असल्याचे आढळले.

याशिवाय MH-46 C-1282 क्रमांकाच्या टेम्पोमध्ये २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बॅरलमध्ये तेलाची बेकायदेशीर साठवणूक सुरू होती. या वाहनात २२० लिटर क्षमतेचे २० रिकामे प्लास्टिक बॅरल्स देखील आढळून आले.

घटनास्थळी जमिनीवर आणखी ८० रिकामे बॅरल्स, एक इलेक्ट्रिक मोटार आणि एक एअर ऑपरेटेड डायाफ्राम (AOD) पंप जप्त करण्यात आला.या सर्व साहित्य, वाहने आणि इंधनासह एकूण सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.संबंधितांकडे आवश्यक परवाने किंवा वैध कागदपत्रे नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच अवैध इंधन साठवणूक, वाहतूक आणि काळाबाजाराशी संबंधित इतर बाबींचाही तपास केला जाणार आहे.

ही कारवाई नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाचे सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी योगेश जंगले, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, रवींद्र राठोड, राजेश सोरते, देवानंद थोरवे, पवन कुंभले, राहुल इंगळे आणि अरुण काते यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

दरम्यान, इंधनाच्या अवैध साठवणुकीमुळे महसूल नुकसान होण्याबरोबरच सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणूक, वाहतूक आणि काळाबाजाराविरोधातील मोहिमा आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदेवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; पिकअप विहिरीत कोसळून १४ भाविकांचा मृत्यू
Next Article आजपासून महापालिकेच्या शाळांची घंटा वाजणार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?