Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»शस्त्र परवान्यांवर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा धाक; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
पिंपरी चिंचवड

शस्त्र परवान्यांवर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा धाक; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 13, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

१५ शस्त्र परवाने रद्द,६८ अर्ज नामंजूर

पिंपरी-चिंचवड, दि.१३ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. विविध कारणांमुळे १५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून, नवीन शस्त्र परवान्यासाठी आलेले ६८ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्तालयाकडून शस्त्र परवान्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये काही परवानाधारकांकडून शस्त्रांचा गैरवापर झाल्याचे तसेच त्यांच्याविरोधात विविध गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. यानंतर संबंधित प्रकरणांची प्राथमिक चौकशी करून पाच परवानाधारकांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच, शस्त्र परवाना मंजूर झाल्यानंतरही नियोजित मुदतीत शस्त्र खरेदी न करणाऱ्या दोन व्यक्तींचे परवाने रद्द करण्यात आले. याशिवाय वृद्धत्व, मृत्यू किंवा इतर कारणांमुळे आणखी आठ परवाने रद्द करण्यात आले. अशा प्रकारे एकूण १५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान, नवीन शस्त्र परवाना मिळविण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांचीही कसून छाननी करण्यात आली. तपासादरम्यान अर्जदारांकडे शस्त्र परवान्याची आवश्यकता सिद्ध करणारे पुरेसे व ठोस कारण नसल्याचे आढळून आल्याने ६८ अर्ज फेटाळण्यात आले.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्पष्ट केले की, शस्त्र परवान्यांबाबत भविष्यातही कठोर धोरण कायम ठेवले जाणार असून केवळ पात्र आणि आवश्यकतेची खात्री पटलेल्या व्यक्तींनाच परवाने दिले जातील. या कारवाईमुळे शस्त्र परवान्यांच्या गैरवापरावर अंकुश बसण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांची नाले व नदीपात्राची पाहणी
Next Article कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या “जागतिक शांतता कराराचे” स्वागत!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?