Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»फिल्मी स्टाईल पोलिसांचा पाठलाग;सराईत चैन स्नॅचर जेरबंद;१५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
पिंपरी चिंचवड

फिल्मी स्टाईल पोलिसांचा पाठलाग;सराईत चैन स्नॅचर जेरबंद;१५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 12, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गुन्हे शाखा युनिट-१ची उल्लेखनीय कामगिरी; पाच गुन्हे उघडकीस

पिंपरी-चिंचवड, दि. १३ : महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळणाऱ्या सराईत चैन स्नॅचरला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने फिल्मी स्टाईल पाठलाग करून अटक केली. या कारवाईत पाच चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणत सुमारे १५ लाख रुपयांचे ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित गोविंद इंगळे (वय ३१, रा. मामुर्डी, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे आहे.

३ जून २०२६ रोजी विशालनगर, पिंपळे निलख येथे पायी चालणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने स्पोर्ट्स बाईकवरून येत हिसकावून नेली होती. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली.

पथकाने आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी तब्बल १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान आरोपीने तळेगाव दाभाडे, देहूरोड आणि दापोडी परिसरातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले. आरोपी बेंगळुरू महामार्गाचा वापर करून वारंवार बाणेर परिसरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला.

७ जून रोजी रात्री आरोपी चैन स्नॅचिंगच्या उद्देशाने बाणेर परिसरात आला असता त्याला पोलिसांची चाहूल लागली आणि तो स्पोर्ट्स बाईकवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले.

तपासात आरोपीने सांगवी,दापोडी,तळेगाव दाभाडे,देहूरोड,भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.या सर्व गुन्ह्यांतील सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

सराईत गुन्हेगाराचा पूर्वइतिहास

सुमित इंगळे याच्यावर यापूर्वी हिंजवडी, सांगवी, शिरवळ आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यांत दरोडा, फसवणूक आणि जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१६ ते २०२४ या कालावधीत त्याच्याविरुद्ध किमान आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने केली.

“अवघ्या चार दिवसांत सीसीटीव्हींच्या आधारे माग काढत फिल्मी स्टाईल पाठलाग करून सराईत चैन स्नॅचरला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-१ला यश आले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.”

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहाळुंगे एमआयडीसीत अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यांवर बुलडोझरची कारवाई!
Next Article केंद्र शासनाच्या आयटीआय ग्रेडिंगमध्ये महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची देशात ७ वी तर राज्यात ५ व्या क्रमांकाची उल्लेखनीय कामगिरी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?