पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर करण्यात आलेल्या निष्कासन कारवाईदरम्यान जमावाने पोलिसांवर दगडफेक करत सरकारी कामात अडथळा आणल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी ३३ जणांना अटक केली असून तीन बालकांचा विधीसंघर्षित बालक म्हणून समावेश करण्यात आला आहे.
चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२, १८९(२), १८९(३), १८९(५), १९०, ३२४(३), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. ९ जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास किंग काटा परिसरातील नायरा पेट्रोलपंपाजवळ सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली. त्यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कुदळवाडी परिसरातील अनधिकृत मंदिर, मशीद तसेच इतर धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करत होती.
याच दरम्यान आरोपी नाजीम नईम चौधरी व इजाज वकार चौधरी यांनी इतर साथीदारांसह सुमारे ३०० ते ५०० जणांचा बेकायदेशीर जमाव जमविल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. जमावाने प्रशासन व पोलिसांच्या कारवाईला विरोध करत दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत बंदोबस्तासाठी तैनात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोविंदराव गोमारे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले.
जमावाने सरकारी वाहन क्रमांक एमएच-१२ व्हीसी-८१४८सह इतर वाहनांची तोडफोड करून नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोविंदराव गोमारे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार नाजीम नईम चौधरी व इजाज वकार चौधरी या दोघांना ९ जून रोजी दुपारी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपी क्रमांक ३ ते ३३ यांना १० जून रोजी अटक करण्यात आली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात १) नाजीम नईम चौधरी वय २६ वर्षे, राह, ऐश्वर्यम हमारा, जाधववाडी, चिखली पुणे,२) इजाज वकार चोधरी वय २६ वर्षे, राह. अक्सा एम्पायर, मोशी रोड, जाधववाडी चिखली पुणे व त्यांचेसोबत,३) मोहम्मद उस्मान हुसेन इंद्रिसी वय २६ वर्षे रा. पुर्णानगर चिखली,४) अब्दुल रहमान सरवर अली इंद्रसी वय २६ रा. कुदळवाडी चिखली,५) आजम फकरुदीन रज्जाक वय १९ रा. मोरेपाटील चौक चिखली,६) मोहम्मद आसीफ हबीबुर रेहमान इंद्रिसी वय १८ रा.मोरे पाटील चोक कुदळवाडी,७) नसरूद्दीन अब्दुल हमीद सिदधीकी वय २० वर्षे रा कुदळवाडी चिखली,८) रफिक शकील शेख वय ३५ वर्षे रा कुदळवाडी चिखली,९) शाही आलम अफजल सिद्धीकी वय २४ वर्षे रा कुदळवाडी चिखली,१०) साहिल अन्सारी शेख वय ३० वर्षे रा. कुदळववाडी चिखली,११) गुलाम हुसेन मेनुल्लाह खान वय १९ वर्षे रा. कुदळववाडी चिखली,१२) निजाम हुसेन नायाब हुसेन सिद्धीकी वय २२ वर्षे रा. कुदळववाडी चिखली,१३) अब्दुल करीम अली मुल्ला चौधरी वय ३५ वर्षे रा. जाधववाडी चिखली,१४) रामदेव परमात्मा प्रताप पांन्डे वय ४८ वर्षे रा. रा कुदळववाडी चिखली,१५) फेजन नियाल चौधरी वय २६ वर्षे रा रा कुवळववाडी चिखली १६) युसुफ खुर्शिद आलम चौधरी वय २३ वर्षे रा. मोरेपाटील चौक कुदळवाडी,१७) अकदस बरकत अली खान वय १८ वर्षे रा. जाधववाडी चिखली,१८) अब्बू सोफिया चौधरी वय ३२ वर्षे रा. रा कुदळववाडी चिखली,१९) नसिम अहम्मद इंद्रिसी वय १९ वर्षे रा. मोरेपाटील चौक चिखली,२०) मोहम्मद नवाज मोहम्मद अली खान वय ३४ वर्षे रा. रा. कुदळवाडी चिखली,२१) कयामुद्धीन सिराजउदीन चौधरी वय २२ वर्षे रा. हरगुडेवस्ती चिखली,२२) मोहम्मद कासिम मेहफुज अलम चौधरी वय २४ वर्षे रा. कुदळववाडी चिखली,२३) फय्यज फत्तेह खान वय २८ वर्षे रा. सेक्टर १६ चिखली,२४) मकसूद मंजुर चौधरी वय २१ वर्षे रा.मोरेपाटील चौक चौधरी,२५) मेहफुज मंजुर चौधरी वय २६ वर्षे रा.मोरे पाटील चोक चौधरी,२६) आकाश रामविलास सुर्यवंशी वय २१ वर्षे रा. मोइ गाव चिखली,२७) जुनेद मज्जीद वेग वय २० वर्षे रा. कुदळववाडी चिखली,२८) मुराद मजीद बेग वय ३४ वर्षे रा. कुदळववाडी चिखली,२९) आरिफ वासउली इंद्रिसी वय ३८ वर्षे रा. जाधववाडी चिखली,३०) अभिनंदन निरज कुमार यादव वय १८ वर्षे रा. अष्टविनायक चौक चिखली,३१) इलियास बासु तांबोळी वय ४४ वर्षे रा. पिंपरी पुणे,३२) शादाब नौशाद मोमीन वय ३३ वर्षे रा. सेक्टर २७ निगडी,३३) शाबाद मोहम्मद सय्यद वय ३१ वर्षे रा. कुदळवाडी चिखली अशी एकूण ३३ आरोपींसह तीन विधीसंघर्षित बालकांचा समावेश केला असून घटनेतील इतर सहभागींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ चित्रीकरण आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, कुदळवाडी परिसरातील अतिक्रमण हटाव कारवाईनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
