Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील दाखल रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर
पिंपरी चिंचवड

फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील दाखल रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वायसीएम रुग्णालयातील तातडीच्या उपचारांमुळे रुग्णांना मिळाले नवजीवन

पिंपरी,दि. ०९ जून २०२६: फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात बाधित तीनही रुग्णांची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली असून त्यांना आज यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार या सर्व रुग्णांवर संपूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले.

विषारी दारू सेवनामुळे गंभीर स्थितीत रुग्णांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले. तसेच आवश्यक वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार आणि विशेष निगा पुरविण्यात आली. रुग्णांच्या नातेवाईकांनाही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि आवश्यक औषधोपचार यांच्या मदतीने रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.

सदर रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत वायसीएम रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विभागातील अनुभवी डॉक्टरांनी रुग्णांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवत आवश्यक उपचार पद्धतींचा अवलंब केला. ज्यामुळे आता सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर झाली असून ते पूर्णपणे बरे होऊन निरोगी अवस्थेत घरी परतत आहेत.

महापालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले. यामुळे पुन्हा एकदा वायसीएम रुग्णालयाची आपत्कालीन आरोग्य सेवा आणि तज्ज्ञ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची क्षमता अधोरेखित झाली आहे.

सदर रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा आणण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण सोनी तसेच डॉ. राहुल गायकवाड, डॉ. राम मुंढे आणि डॉ. नम्रता करकनाळे यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली व रुग्णांच्या उपचारादरम्यान कोणतीही कमतरता राहू नये याची काळजी घेतली.

“विषारी दारू प्रकरणातील बाधित रुग्णांना तातडीने आणि सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने आवश्यक त्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या. सर्व रुग्णांची प्रकृती सुधारून त्यांना घरी जाता येत आहे, ही समाधानाची बाब आहे. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे”.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

“विषारी दारू प्रकरणातील रुग्णांची स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यावर तातडीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने उपचार करण्यात आले. विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी समन्वयाने काम करत रुग्णांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले. वैद्यकीय विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर केलेल्या उपचारांमुळे सर्व रुग्णांची प्रकृती पूर्णपणे सुधारणे शक्य झाले”

– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

“आपत्कालीन परिस्थिती तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर अत्यंत दक्षतेने उपचार केले. रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या, औषधोपचार आणि सुविधा वायसीएम रुग्णालयामार्फत वेळेत व मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या”

– डॉ. अभयचंद्र दादेवार, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleख्रिस्तोपर राजमनी यांची आरपीआय (आठवले) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती
Next Article चिखली-कुदळवाडी अतिक्रमण कारवाईवरून वाद; धार्मिक स्थळांवरील कारवाईनंतर परिसरात तणाव
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?