Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»शिर्डीत उसळला लोककलेचा महासागर !
महाराष्ट्र

शिर्डीत उसळला लोककलेचा महासागर !

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

‘श्री साई जीवन गौरव पुरस्कार’ देऊन लोककलावंतांचा सन्मान

शिर्डी, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, लोकसंस्कृती आणि ग्रामीण परंपरांचे वैभव उजागर करणारा भव्य लोककलावंत महामेळावा व लोककलावंत सन्मान सोहळा नुकताच शिर्डी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्री साईबाबा संस्थान, शिर्डी यांच्या सहकार्याने आणि लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात राज्यभरातील तब्बल आठ हजारांहून अधिक लोककलावंतांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या चरणी काढण्यात आलेल्या भव्य प्रभात फेरीने झाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या हजारो महिला व पुरुष कलावंतांनी या फेरीत सहभागी होत लोककलेचा जागर केला. त्यानंतर शिर्डी संस्थानच्या शताब्दी मंडप सभागृहात लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

या महोत्सवात आदिवासी नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, सनई-संबळ वादन, बँड पथक, भारूड, पोवाडे, तमाशा आदी विविध लोककला प्रकारांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. कलाकारांच्या दमदार सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. सभागृहात एवढी गर्दी झाली होती की बसण्यासाठीही जागा उपलब्ध नव्हती.

लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे आणि त्यांच्या कार्यात खांद्याला खांदा लावून योगदान देणाऱ्या निर्मला सरोदे यांच्या ग्रामीण व दुर्गम भागातील उपेक्षित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली आज संघटनेत सुमारे ५० हजार लोककलावंत कार्यरत असून महाराष्ट्रातील लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे.

ग्रामीण भागातील अनेक गुणी कलाकारांना योग्य संधी मिळत नसल्याने त्यांची कला लोप पावण्याच्या मार्गावर असल्याची बाब लक्षात घेऊन गवनेरजी सरोदे यांनी गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर लोककलावंतांचे भक्कम जाळे उभे केले आहे. त्यामुळे हजारो कलाकारांना नवे व्यासपीठ मिळाले असून लोककलेच्या संवर्धनाला मोठी चालना मिळाली आहे.

कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच निवडक कलावंतांना “श्री साई जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.

शिर्डी संस्थानच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांचा सत्कार केला. शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी दूरध्वनीद्वारे आयोजक आणि कलावंतांना शुभेच्छा दिल्या. लोककलावंतांच्या प्रश्नांसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भांगरे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन मंगेश फाटकर यांनी केले. आभार प्रदर्शन संपादक पोपट सोनवणे यांनी मानले.हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी गवनेरजी सरोदे, सर्जेराव कदम, नवनाथ राक्षे, रवींद्र वाकोडे, धोंडीराम दिवे, राजू मंतोडे, ज्ञानेश्वर गांगड, दिलीप पवार, मच्छिंद्र आसवले, ललित धनगर, नारायण पथवे, विमल डोंगरे, सोमा आसवले, अनिल सोनवणे, मारुती आसवले तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटना आणि हजारो महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोककलेचा वारसा जपत ग्रामीण कलाकारांना नवे बळ देणारा हा महामेळावा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक संस्मरणीय पर्व ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post Views: 16
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
Next Article अपघातातील मृतदेह शिक्रापूर हद्दीत टाकून फरार झालेला आरोपी ४८ तासांत जेरबंद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?