Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»राजकीय»पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची रणनिती निश्चित; १ लाख वृक्षारोपणासह मोदी सरकारच्या योजनांचा घराघरांत प्रचार
राजकीय

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची रणनिती निश्चित; १ लाख वृक्षारोपणासह मोदी सरकारच्या योजनांचा घराघरांत प्रचार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विभागीय आढावा बैठकीत निरंजन डावखरे यांचा निर्धार; योग दिन,आणीबाणी स्मरण आणि जनकल्याण अभियानांवर भर

पिंपरी-चिंचवड, दि. ३ जून : भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड आणि पुणे उत्तर (मावळ) जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण विभागीय आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी संघटनात्मक कार्यक्रमांचे नियोजन, मोदी सरकारच्या योजनांचा जनतेपर्यंत प्रभावी प्रचार आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीला भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व विभाग समन्वयक आमदार निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विभाग सहसंयोजक विक्रम देशमुख, अभियान प्रदेश सहसंयोजक विक्रम पाचपुते आणि जिल्हा प्रभारी भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि पुणे उत्तर (मावळ) जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.

राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘मोदी सरकारची यशस्वी वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण’ या महाअभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड जिल्ह्यासाठी चार प्रमुख उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली.

यामध्ये ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात एका दिवसात किमान १५ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले असून संपूर्ण आठवड्यात १ लाखाहून अधिक झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी विविध योग संस्था, पतंजली परिवार आणि नागरिकांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे.

२५ जून रोजी आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्या काळात तुरुंगवास भोगलेल्या मिसाबंदी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध मंडलांमध्ये प्रदर्शने, चित्रकला स्पर्धा आणि लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया अभियान राबविण्यात येणार आहे.

बैठकीत पक्षाच्या ‘SIR’ नोंदणी अभियानाचाही आढावा घेण्यात आला. भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात हे अभियान वेगाने सुरू असून आतापर्यंत सुमारे ४० टक्के नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती शत्रुघ्न (बापू) काटे यांनी दिली. पुढील १५ दिवसांत हा आकडा ५० टक्क्यांच्या पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मार्गदर्शन करताना आमदार निरंजन डावखरे यांनी पिंपरी-चिंचवड भाजपच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. पक्षाचे राष्ट्रीय आणि प्रांतीय उपक्रम तसेच सरकारी योजनांचा प्रभावी प्रचार करण्यात पिंपरी-चिंचवड जिल्हा राज्यात नेहमीच आघाडीवर राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

या बैठकीस आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरशेठ जगताप, माजी खासदार अमर साबळे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार अश्विनीताई जगताप, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सदाशिवराव खाडे, वैशाली खाडये, विकास डोळस यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र व मावळ परिसरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन योगेश बाचलं यांनी केले तर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.

Post Views: 26
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआकुर्डीतील हॉटेल मॅजेस्टिक परिसरातील १२ हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
Next Article NCERT ला बगल, पालकांवर हजारोंचा बोजा?; रेड क्लिफ स्कूलविरोधात संतप्त पालकांचा एल्गार
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

“सत्तेसाठी नाही, सेवेसाठी” — ‘शिवशाही शासन’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना

May 22, 2026

’शतप्रतिशत भाजपा’चा विचार घराघरांत पोहोचवा – प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

May 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?