Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»फुगेवाडी विषारी दारू दुर्घटना: पीडितांना ५ लाखांची शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आमदार अमित गोरखे यांचा पाठपुरावा
पिंपरी चिंचवड

फुगेवाडी विषारी दारू दुर्घटना: पीडितांना ५ लाखांची शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आमदार अमित गोरखे यांचा पाठपुरावा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आमदार अमित गोरखे यांनी घेतली पुणे जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट; प्रशासकीय कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याची मागणी 

पुणे, ०३ जून २०२६ : फुगेवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी विषारी दारू दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे जाहीर केलेली ५ लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी, यासाठी आमदार अमित गोरखे यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला. यावेळी आमदार गोरखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन प्रशासकीय कार्यवाही त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

मंत्री महोदयांचे आश्वासन

फुगेवाडी येथे घडलेल्या या धक्कादायक विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्याचे मंत्री श्री. गिरीशजी महाजन यांनी पीडित कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी शासनाच्या वतीने या घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते.

मदतीची तातडीने आवश्यकता

या दुःखद घटनेला आता काही काळ उलटून गेला असून, बाधित कुटुंबे अजूनही या आर्थिक मदतीची प्रतीक्षा करत आहेत. घरातील प्रमुख कमावती व्यक्ती गमावल्यामुळे या सर्व कुटुंबियांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यांना तातडीने आधाराची आणि मदतीची गरज असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्यात यावी

मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार, मृत व्यक्तींच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्यात यावी. यासाठी आवश्यक असणारी जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय कार्यवाही त्वरित पूर्ण करण्यात यावी. मदतीची रक्कम लवकरात लवकर पीडितांच्या बँक खात्यावर थेट जमा व्हावी, अशी मागणी यावेळी आमदार अमित गोरखे यांनी यावेळी केली आहे.

आमदार अमित गोरखे यांनी घेतलेल्या या तत्पर पाठपुराव्यामुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या सकारात्मक चर्चेमुळे फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना लवकरच शासनाची मदत मिळून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअपहृत अल्पवयीन मुलीचा ४ दिवसांत शोध
Next Article मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ ला गती ३५०० किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार ४२९ कोटींना मंजुरी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?