Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»“पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा ॲक्शन मोड; नियमभंग करणाऱ्यांकडून कोट्यवधींचा दंड”
पिंपरी चिंचवड

“पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा ॲक्शन मोड; नियमभंग करणाऱ्यांकडून कोट्यवधींचा दंड”

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

एका महिन्यात ६२ हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई; ६.७६ कोटी रुपयांचा दंड वसूल

पिंपरी, दि. २ जून : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहनसंख्या आणि वाहतूक नियमांचे वाढते उल्लंघन लक्षात घेऊन वाहतूक शाखेने मे २०२६ महिन्यात विशेष धडक मोहीम राबवत तब्बल ६२ हजार ७२७ वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईतून ६ कोटी ७६ लाख ३० हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही प्रमुख औद्योगिक केंद्रे, हिंजवडी, तळवडे व चिखली येथील आयटी पार्क तसेच देहू-आळंदी ही धार्मिक स्थळे असल्याने दररोज लाखो वाहनांची ये-जा होत असते. शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि वाहनसंख्येतील वाढ यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली.

नो पार्किंग आणि टोईंग कारवाईत आघाडी

वाहतूक शाखेने सर्वाधिक कारवाई वाहतुकीस अडथळा व नो पार्किंग प्रकरणांमध्ये केली असून १९ हजार ३४० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर ११ हजार ५८० वाहनांवर टोईंग कारवाई करण्यात आली.

सिग्नल जंपिंग, ट्रिपल सीट आणि जड वाहनांवरही वचक

मोहीमेदरम्यान ८ हजार ४८३ सिग्नल जंपिंग, ६ हजार ५३९ ट्रिपल सीट, ८ हजार १४२ जड-अवजड वाहनांवरील नियमभंग, तसेच १ हजार ९९३ मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली.

याशिवाय ४०२ मद्यधुंद वाहनचालक, १ हजार ३२ मॉडिफाईड सायलेंसर, ३ हजार ९० काळी काच, ८७० विना परवाना वाहनचालक आणि २३९ राँग साईड वाहनचालकांवर देखील कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

या विशेष मोहिमेत एकूण ६२,७२७ वाहनचालकांवर कारवाई करून ६.७६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी तसेच दंडात्मक व न्यायालयीन कारवाई टाळावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने नागरिकांना केले आहे.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य
Next Article अवैध दारू माफियांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा प्रहार!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?