आळंदी, दि. ३० मे २०२६: आळंदी पोलिसांनी चऱ्होली खुर्द परिसरात कारवाई करत १०५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असून एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई ३० मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास मौजे चऱ्होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे येथील ज्ञानसागर मंगल कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई रामदास शेवराव दहिफळे (बकल क्रमांक २०१२), नेमणूक आळंदी पोलीस ठाणे, यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी निर्मला संभा रजपत (वय ५८, रा. वडगाव रोड, ज्ञानसागर मंगल कार्यालयामागे, चऱ्होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे ९ हजार २५० रुपये किमतीची १०५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू तीन कॅनमध्ये आढळून आली. बेकायदेशीररीत्या दारू साठवून ठेवल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दूधमल पोडवा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे