Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»घनकचरा नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांवर महापालिका करणार दंडात्मक कारवाई
पिंपरी चिंचवड

घनकचरा नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांवर महापालिका करणार दंडात्मक कारवाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ओल्या कचऱ्याची स्थानिक पातळीवर प्रक्रिया बंधनकारक; नियमभंगास दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा

पिंपरी, ३० मे २०२६ : शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ चे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिला आहे.

केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंतर्गत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था अर्थात ‘बल्क वेस्ट जनरेटर्स’वर अतिरिक्त जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. दररोज १०० किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या, २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या किंवा दररोज ४० हजार लिटरपेक्षा अधिक पाणी वापरणाऱ्या आस्थापनांचा या वर्गात समावेश होतो.

या संस्थांनी आपल्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, ‘एक्स्टेण्डेड बल्क वेस्ट जनरेटर रिस्पॉन्सिबिलिटी’ अंतर्गत आवश्यक कार्यवाही करणे, केंद्रीकृत पोर्टलवर नोंदणी करणे तसेच कचरा व्यवस्थापनाची नियमित नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या आणि आस्थापनांनी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन त्यांच्या स्तरावरच करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून संबंधित संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्याबाबतची माहिती वर्तमानपत्रांमधूनही प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळणे सर्व संबंधित संस्थांसाठी बंधनकारक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्या संस्था आणि आस्थापनांवर प्रथम स्तरावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, सातत्याने उल्लंघन आढळल्यास पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाईचीही तरतूद असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत पिंपरी चिंचवड शहर अग्रेसर राहावे, यासाठी सर्व संबंधितांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.घनकचरा व्यवस्थापन नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरातील सर्व मोठ्या कचरा निर्मिती संस्थांनी निर्धारित प्रक्रियेचे पालन करून आवश्यक नोंदणी व कचरा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन उप आयुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांनी केले आहे.

“स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्यासाठी कचऱ्याचे स्त्रोतावर व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांनी ही जबाबदारी स्वीकारून नियमानुसार कचरा प्रक्रिया करणे गरजेचे आहे. शहराच्या स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी सर्व घटकांनी सक्रिय सहकार्य करावे.”
             -डॉ. विजय सूर्यवंशी,आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार आणि घनकचरा व्यवस्थापन नियमांच्या चौकटीत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांनी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन त्यांच्या स्तरावर करणे बंधनकारक आहे. महापालिकेकडून याबाबत नोटिसा देण्यात आल्या असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रथम दंडात्मक आणि आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येईल. स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवडसाठी सर्व संबंधित संस्थांनी सहभाग घ्यावा”

           -कुलदीप जंगम,अतिरिक्त आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी महापौर रवि लांडगे आक्रमक; NHAI समोर शहरातील प्रलंबित प्रश्नांचा पाढा, तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन
Next Article रोजगार हमीच्या विहीर, गाय गोठा योजनांमध्ये पारदर्शकतेची अपेक्षा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?