Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»रोजगार हमीच्या विहीर, गाय गोठा योजनांमध्ये पारदर्शकतेची अपेक्षा
महाराष्ट्र

रोजगार हमीच्या विहीर, गाय गोठा योजनांमध्ये पारदर्शकतेची अपेक्षा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 31, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
 सर्वसामान्य शेतकरी लाभापासून वंचित असल्याची भावना

छत्रपती संभाजी नगर (वैजापूर) प्रतिनिधी विजयकुमार मोकळे : महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सिंचन विहीर व गाय गोठा या महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत वैजापूर पंचायत समिती गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याची भावना अनेक लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी सुमारे पाच लाख रुपये तर गाय गोठ्यासाठी एक ते दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक लाभार्थ्यांची यादी तयार करून ती पंचायत समितीकडे पाठवतात. त्यानंतर शासनाकडून उद्दिष्टे (टार्गेट) प्राप्त झाल्यावर मंजुरीची प्रक्रिया राबविली जाते.

मात्र, वैजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा आरोप आहे की, मागील तीन ते चार वर्षांमध्ये सिंचन विहीर व गाय गोठा मंजुरी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. ज्यांची आर्थिक क्षमता होती किंवा ज्यांनी कथितपणे आर्थिक देवाणघेवाण केली, अशाच लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाल्याची चर्चा तालुक्यात वारंवार होत राहिली. यासंदर्भात पंचायत समिती कार्यालयासमोर विविध आंदोलनेही करण्यात आली होती.

विशेषतः अनेक लाभार्थ्यांचे अकुशल कामाचे पैसे अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप होत असून काही महिन्यांपूर्वी संतप्त लाभार्थ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे रोजगार हमी योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

दरम्यान, सिंचन विहीर व गाय गोठा मंजुरीची प्रक्रिया गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होत असल्याने प्रशासनाने अधिक पारदर्शक पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

याबाबत तालुक्याचे आमदार प्रा. रमेश बोरणारे यांनी पंचायत समिती प्रशासनाच्या बैठकीत योजनांची अंमलबजावणी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जाते. तसेच भाजपचे नेते दिनेश परदेशी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांनीदेखील प्रशासनाला याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आहे.

यंदाच्या वर्षी पंचायत समितीत अनुभवी गटविकास अधिकारी म्हणून जायभाय यांची नियुक्ती झाल्याने योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू प्रश्नाकडेही लक्ष देण्याची मागणी

दरम्यान, शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद असतानाही मागील वर्षी या संदर्भातील प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात आली नसल्याची नाराजी लाभार्थ्यांमध्ये आहे. यावर्षी रमाई आवास योजनेंतर्गत वैजापूर तालुक्यातील ५७७ अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून त्यांना नियमानुसार वाळू उपलब्ध झाल्यास मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

त्यामुळे रोजगार हमी योजना, सिंचन विहिरी, गाय गोठे तसेच घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू उपलब्धतेची प्रक्रिया गतिमान करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची जबाबदारी पंचायत समिती प्रशासनावर असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. आता तरी योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने होऊन खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचतील का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post Views: 42
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleघनकचरा नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्या व आस्थापनांवर महापालिका करणार दंडात्मक कारवाई
Next Article उन्हाच्या झळांपासून दिलासा; मुंबई-नवी मुंबईत मान्सून पूर्व पाऊस,रविवारची सुरुवात आल्हाददायक वातावरणात
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?