Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड महापालिकेची २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसुली
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेची २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसुली

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
दोन लाखांहून अधिक मिळकतधारकांनी भरला कर; ऑनलाइन भरण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद

पिंपरी, दि. २६ मे २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १ एप्रिल २०२६ ते २६ मे २०२६ (दुपारी १२ वाजेपर्यंत) या कालावधीत २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे. आतापर्यंत शहरातील २ लाख ३२ हजार ३८५ मिळकतधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला असून, उर्वरित मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

महापालिकेकडून ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, त्याला शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २ लाख ८ हजार ५७० नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. या नागरिकांकडून २१२ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कराचा भरणा डिजिटल माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमातून कर भरण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या तसेच मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्ताधारकांना चालू आर्थिक वर्षाचे कर देयक वेळेत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महापालिकेकडून महिलांच्या नावावरील मालमत्ता, दिव्यांग नागरिक तसेच पर्यावरणपूरक निवासी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध सवलती देण्यात येत आहेत. विशेषतः ऑनलाइन कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी १० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक डिजिटल पद्धतीचा वापर करत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष गर्दी टाळून घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

“पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर वेळेत भरून महापालिकेच्या विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे, ही समाधानाची बाब आहे. ऑनलाइन कर भरणा आणि विविध सवलतींना मिळणारा प्रतिसाद नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास दर्शवितो. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि इतर नागरी सेवांच्या बळकटीसाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा आर्थिक स्रोत आहे. ज्या नागरिकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी ३० जूनपूर्वी कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा तसेच पुढील कारवाई टाळावी.”

— डॉ. विजय सूर्यवंशी.आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये आतापर्यंत २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर संकलित झाला असून, दोन लाखांहून अधिक मिळकतधारकांनी कर भरला आहे. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येने नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून कर भरण्यास प्राधान्य दिले असून, त्यातून १० टक्के सवलतीचाही लाभ घेतला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेत प्रत्यक्ष येण्याऐवजी सुरक्षित आणि सुलभ ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरून वेळ, श्रम आणि गर्दी टाळावी. उर्वरित मालमत्ताधारकांपर्यंतही लवकरच देयके पोहोचविली जातील.”
— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरक्षक चौक भुयारी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू; नियमांचे पालन करण्याचे महापालिकेचे आवाहन
Next Article वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा – वनमंत्री गणेश नाईक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?