Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा; शहर विद्रुपीकरण करणाऱ्या जाहिरातदारांवर कारवाई करा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
पिंपरी चिंचवड

नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा; शहर विद्रुपीकरण करणाऱ्या जाहिरातदारांवर कारवाई करा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 25, 2026Updated:May 25, 2026No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २५ मे २०२६ – संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम युद्धपातळीवर पुर्ण करून नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा. तसेच नाल्यांचा प्रवाह सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घ्या, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. याशिवाय, अनधिकृतपणे जाहिरात फलक किंवा विविध ठिकाणी पत्रके चिकटवून शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध विभागांच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी सूचना देताना ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, मनोज सेठिया, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उप आयुक्त सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल, राजेश आगळे, व्यंकटेश दुर्वास, कार्यकारी अभियंता महेश बरीदे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सरगर, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पुजा दुधनाळे, मुकेश कोळप आदी उपस्थित होते. बैठकीत नालेसफाई, शहर स्वच्छता, अनधिकृत जाहिरात, जलतरण तलाव कार्यान्वयन अशा प्रमुख विषयांसंदर्भात आढावा घेण्यात आला.

रस्ते दुभाजक, स्वच्छता तसेच सुशोभित चौक यावरून शहराची सुंदरता जाणवत असते. त्यामुळे या बाबी आकर्षक, स्वच्छ आणि सुंदर असायला हव्यात असे नमूद करून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शहरातील प्रमुख रस्ते दुभाजकांमध्ये सुशोभित झाडे लावावीत तसेच या झाडांची वेळोवेळी छाटणी करावी. तसेच महत्वाचे चौक देखील आकर्षक पद्धतीने सजवून त्या ठिकाणी स्वच्छता राखावी. सुशोभीकरणासाठी अनेक संस्था अथवा कंपन्या पुढे येत असतील तर त्यांचे सहकार्य घ्यावे. आपले शहर अधिक सुंदर असावे यासाठी महापालिका कटिबद्ध असून बसथांबे, भिंती, कार्यालये, उद्याने, शाळा अशा सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, स्टिकर्स किंवा जाहिरात फलकाच्या माध्यमातून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. अशा व्यक्ती अथवा संस्थांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी कारवाई करण्याचा इशारा यावेळी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिला. याबाबत त्यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना स्पष्ट निर्देश दिले असून यामध्ये हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल असे देखील ते यावेळी म्हणाले.

काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून मुख्य रस्त्यांसह पुलावर पाणी तुंबणार नाही यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेऊन पाणी निचरा होणाऱ्या ठिकाणचा कचरा तातडीने हटवावा. नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी नालेसफाईचे काम युद्धपातळीवर पुर्ण करा. नाला बुजविणे अथवा नाल्यांवरील अतिक्रमणांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई करा. नाल्यांवरील अतिक्रमण प्राधान्याने हटविले पाहिजे. पाणी तुंबल्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता असते, अशावेळी नाल्याचा नैसर्गिक मार्ग खुला असणे गरजेचे आहे. या प्रवाहाला कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता नालेसफाई करताना घ्यावी. शहरातील सर्व प्रमुख नाल्यांच्या सफाईबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील नालेसफाई देखील करावी. यासाठी उद्योजक, औद्योगिक विभागाचे अधिकारी आणि महापालिका यांची समन्वय बैठक घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

शहरातील महत्वाची ठिकाणे, उद्याने आणि सार्वजनिक जागांवरील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई ठेवा तसेच मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांची प्राधान्याने दुरूस्ती करा. महापालिकेच्या जलतरण तलावांबाबत केल्या जाणाऱ्या कार्यान्वयन पद्धतींवर सातत्याने पाहणी करून याबाबत कोणाचीही तक्रार येणार नाही असे नियोजन करावे. जलतरण तलावाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार अथवा जिवित हानी होणार नाही याची दक्षता याठिकाणी नियुक्त असलेल्या जीवरक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. विशेषत: पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्यांकडे बारकाईने लक्ष ठेवावे तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईची कामे वेगाने सुरू असून, विविध अडचणींवर मात करत ३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे तसेच रस्ते विकासाच्या कामांमुळे काही नाल्यांपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय, खोल आणि अवघड भागातील नालेसफाईसाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्पायडर मशीनची अनुपलब्धता हीदेखील मोठी अडचण ठरत आहे. मात्र, या सर्व अडचणी असूनही पालिकेने पर्यायी नियोजन करत नालेसफाईची मोहीम अखंड सुरू ठेवली आहे.

शहरातील १४१ नाल्यांपैकी ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या नाल्यांच्या सफाईचे ८५.८४ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामालाही गती देण्यात आली आहे. गाळ, प्लास्टिक कचरा, झुडपे आणि इतर अडथळे हटवून नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.

आरोग्य विभागाकडून संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधला जात असून, अडथळ्यांच्या ठिकाणी पर्यायी पद्धतीने काम पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन केले जात आहे. नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

शहरातील नालेसफाई प्रगती

शहरातील एकूण नाले – १४१

* नाल्यांची एकूण लांबी – ९४ हजार ९१३ मीटर

* एकूण सफाई प्रगती – ८५.८४ टक्के

* मेट्रो आणि रस्ते, ड्रेनेज लाईन कामांमुळे काही ठिकाणी अडथळे

“पावसाळ्यात नागरिकांना साचलेल्या पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी नालेसफाईच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मेट्रो आणि रस्ते कामांमुळे काही तांत्रिक अडचणी असल्या तरी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत”

……-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पहिल्या पावसात नाल्यांमधील पाण्याचा वेग आणि प्रवाह लक्षणीय वाढतो त्यात मेट्रोची सुरू असलेली कामे, ड्रेनेज लाईन,स्थापत्य विषयक कामे यामुळे पहिल्या पावसांमध्ये रस्त्यावरती पाणी साठण्याच्या घटना घडतात परंतु या सर्व कामासह नाले सफाईचे काम पावसाळ्या पूर्वी म्हणजेच ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून पावसात रस्त्यावर पाणी साठणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे”

…-डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“बिल्डर-शाळा माफियांनी गिळला नैसर्गिक नाला, राहटणी-काळेवाडी बुडण्याच्या उंबरठ्यावर”
Next Article प्रभाग क्र. १० मधील नागरी समस्यांवर नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ तोडगा!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?